भारतीय अर्थव्यवस्थेची पुन्हा उभारी;उत्पादन क्षेत्राची वाढ ६.९ ट्के;अनुराग ठाकूरांचे चिदंबरम यांना प्रत्युत्तर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे कितीही नकारात्मक चित्र मांडले, तरी आकडेवारी तसे सांगत नाही. उलट आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थांनी भारताची आर्थिक वाढ डबल डिजिट होण्याचा निर्वाळा दिला आहे, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले. Consistent reforms & strong fundamentals ensured India had a swift rebound from a contraction

विविध आर्थिक क्षेत्रातील आकडेवारीच देशासमोर ठेवत त्यांनी पी. चिदंबरम यांनी मांडलेला प्रत्येक मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. अनुराग ठाकूर म्हणाले, की जीडीपीचा ताजा डेटा हे दाखवून देतोय, की मार्च २०२१ तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ ६.९ टक्के झाली आहे, तर बांधकाम क्षेत्राची वाढ १४.५ टक्के, स्टील आणि सिमेंट उत्पादनातली वाढ २७.३ टक्के झाली आहे. या वाढीची तुलना मार्च २०२० च्या लॉकडाऊनच्या आधीच्या कालावधीशी केली, तर दोन्ही क्षेत्रे अनुक्रमे ४०० टक्के आणि ५४९ टक्के एवढ्याने वाढली आहेत.

कोरोना महामारी आणि मंदीच्या फेऱ्यातून सावरण्याची भारतीय उद्योगक्षेत्राच्या क्षमतेवर चिदंबरम यांनी संशय व्यक्त केला आहे. पण मध्यम उद्योग आणि छोट्या उद्योगांची ताकद अशी आहे, की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. शिवाय वरची आकडेवारी तर चिदंबरम यांच्या दाव्याची पुष्टी करतच नाही. उलट आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थांनी २०२१ – २२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ १२.५ टक्क्यांनी होईल, असे भाकित वर्तविले आहे. याचा अर्थ आपण डबल डिजीट वाढ असलेली जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ठरू, असे त्यांचे म्हणणे आहे, याकडे अनुराग ठाकूर यांनी लक्ष वेधले.

आर्थिक सुधारणा धोरणातील सातत्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया यामुळे २४.४ टक्क्यांच्या नकारात्मक वाढीकडून २०२० – २१ च्या पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर १.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला. हे सर्व भारतीय उद्योगक्षेत्राच्या क्षमतेचे द्योतक आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Consistent reforms & strong fundamentals ensured India had a swift rebound from a contraction

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात