विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. प्रियांका गांधी यांच्या रूपाने उत्तर प्रदेशात बदलाचे वारे वाहत आहेत. विधानसभेची निवडणूक त्यांच्या देखरेखीखाली लढविली जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तीन दशकांच्या खंडानंतर उत्तर प्रदेशात सत्तेवर पुनरागमन करेल असे प्रदेश काँग्रेस प्रमुख अजयकुमार लल्लू यांनी म्हटले आहे. congress will contest poll in UP on its own
लल्लू म्हणाले की, युती न करता लढण्याची आणि पुढील सरकार स्वबळावर स्थापन करण्याची क्षमता काँग्रेसकडे आहे. अत्याचारी भाजप सरकारचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसने स्थान निर्माण केले आहे. आमच्याकडे पाचच आमदार असले तरी ४०३ सदस्यांच्या विधानसभेत ४९ आमदार असलेल्या सपपेक्षा परिणामकारक विरोधी पक्ष काँग्रेस असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे.
लल्लू म्हणाले की, प्रियांका यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पातळ्यांवर पक्षाचे संघटन भक्कम करण्यात आले आहे. त्या राज्याच्या सूत्रधार आहेत. उत्तर प्रदेशची जनता काँग्रेसकडे आशेने पाहात आहेत. प्रियांका यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये बराच उत्साह निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App