मेन स्ट्रीम मीडियावर काँग्रेसचा प्रचंड रोष; राजस्थानात भारत जोडो यात्रेवरून; तर गुजरात मध्ये मोदींच्या रोड शो वरून!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरात मध्ये आज दुसऱ्या टप्प्यातले अखेरचे मतदान होत असताना आणि राजस्थानात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असताना काँग्रेस पक्षाने मेन स्ट्रीम मीडियावर प्रचंड रोष व्यक्त केला आहे. राजस्थानात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मेन स्ट्रीम मीडिया अजिबात प्रसिद्धी देत नाही. जणू काही मीडियाने भारत जोडो यात्रेवर बहिष्कार घातला आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे, तर गुजरात मधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मधल्या रोड शो ला मीडियाने प्रचंड प्रसिद्धी दिली. त्याचे जाहिरातीच्या दराने पैसे वसूल करा, असा तगादा काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी लावला आहे. एकूण काँग्रेसने राजस्थान आणि गुजरात मधल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर मेन स्ट्रीम मीडियाला घेरले आहे. Congress very much unhappy over poor main stream media coverage to rahul Gandhi’s bharat Jodo yatra and over coverage to Narendra modi’s road show

राहुल गांधींची यात्रा राजस्थानात पोहोचली आहे. तेथे अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेदावर अजून तोडगा सापडलेला नाही. तरी देखील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जनतेने प्रचंड प्र zतिसाद दिला असल्याचा दावा अशोक गेलोत यांनी केला आहे. त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियात उमटले आहे, असे त्यांनी म्हटले आहे पण त्याच वेळी मेन स्ट्रीम मीडियाने मात्र भारत जोडो यात्रेवर जणू बहिष्कार घातला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. वास्तविक मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. राहुल गांधी सत्यासाठी रस्त्यावर येऊन लढत आहेत. मग मीडियाचे त्यांना प्रसिद्धी देण्याचे कर्तव्य नाही का?, असा सवाल करून अशोक गेहलोत यांनी मीडिया रिपोर्टर्स विषयी देखील सहानुभूती दाखविली आहे. तुम्ही तुमची न्यूज फीड्स तुमच्या न्यूज चॅनेलला आणि बाकीच्या मीडियाला जरूर पाठवता. पण मग राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पुरेसे कव्हरेज का मिळत नाही?? ते कव्हरेज नेमके कोण आणि कुठे रोखतो??, याचा शोध घेतला पाहिजे, असे वक्तव्य अशोक गेहलोत यांनी केले आहे.तर दुसरीकडे गुजरात मध्ये आज मतदान होत असताना वेगवेगळ्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाला घेरले आहे. त्याचबरोबर त्यांनी मीडियालाही काही सवाल केले आहेत. गुजरात मध्ये पहिल्या टप्प्यात मतदान सुरू असताना मोदींनी तब्बल 4 तासांचा रोड शो केला. त्याला मीडियाने संपूर्ण लाईव्ह प्रसिद्धी दिली. निवडणूक आयोगाने त्याकडे डोळेझाक का केली? काँग्रेसच्या तक्रारीकडे का लक्ष दिले नाही? शिवाय मीडिया देखील 4 तास एवढे प्रचंड कव्हरेज मोदींच्या पदयात्रेला देतो. मग त्याचा खर्च भाजपच्या निवडणूक खर्चात का दाखविला जात नाही? मीडिया जाहिरातीच्या दरात त्याचा खर्च भाजपकडून का वसूल करत नाही?, असा सवाल पवन खेडा यांनी केला. हा खर्च मीडियाला मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल. म्हणजे तरी किमान मीडियाच्या मालकांचा काँग्रेस वरचा रोष थोडा दूर होईल, असा टोला पवन खेडा यांनी लगावला.

पवन खेडा यांनी निवडणूक आयोगाच्या तटस्थ विषयी देखील शंका उपस्थित केल्या. काँग्रेसच्या उमेदवारांच्या जीविताला धोका असल्याचे पत्र खुद्द उमेदवाराने देऊन देखील निवडणूक आयोगाने त्याकडे डोळेझाक का केली?, असा सवाल त्यांनी केला. पण राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेसचा सगळा रोष मेन स्ट्रीम मीडियावर असल्याचेच दिसून आले.

Congress very much unhappy over poor main stream media coverage to rahul Gandhi’s bharat Jodo yatra and over coverage to Narendra modi’s road show

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण