अशोक गहलोत : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माफीसह माघार; मुख्यमंत्री पदाच्या फैसल्याचा सोनियांवर ‘भार’


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गलत यांनी आपण किती मुरब्बी आणि काँग्रेसच्या राजकारणातले मुरलेले नेते आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे!! राजस्थानातील तीन दिवसांच्या संघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर ते दिल्लीत दाखल झाले. 10 जनपथ वर जाऊन सोनिया गांधी यांची माफी मागून मोकळे झाले, पण त्याचवेळी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडले नाही, तर आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले!! Ashok Gehlot : apologised sonia Gandhi, announced not to contest Congress presidential election, but didn’t quit the chief minister’s post

पण त्याचवेळी अशोक गहलोत हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोनिया गांधी यांच्यावर सोपवून मोकळे झाले!!



सोनिया गांधी यांच्याशी अशोक गहलोत यांनी 10 जनपथ मध्ये जाऊन दीड तास चर्चा केली. सोनियांच्या हाती लेखी माफी सोपवली. आपण काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असूनही परंपरेनुसार विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर सोपवण्याचा एका ओळीचा प्रस्ताव संमत करून घेऊ शकलो नाही, याची खंत आपल्याला जन्मभर राहील याची कबुली त्यांनी सोनिया गांधी यांच्यापाशी दिली. तसे त्यांनी 10 जनपथच्या बाहेर पत्रकारांना सांगितले. काँग्रेसच्या परंपरेनुसार संबंधित प्रस्ताव संमत करून घेण्याची नैतिक जबाबदारी विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्यमंत्री म्हणून आपली होती. पण ती पार पाडू शकलो नाही म्हणून आपण सोनिया गांधी यांची माफी मागितली. आता आपण नैतिक जबाबदारी म्हणून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पण त्याचवेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आपण सोडणार का?, या प्रश्नाला उत्तर देताना मात्र त्याचा फैसला खुद्द सोनिया गांधी करतील असे सांगून अशोक गहलोत तेथून निघून गेले.

 पेच अध्यक्षपदाचा नव्हताच!!

अशोक गहलोत यांच्या या राजकीय खेळीतून मूळ प्रश्न तयार झाला आहे, तो म्हणजे मूळात राजस्थानातला पेचप्रसंग काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा होता का??… तर तो तसा नव्हताच!! पेचप्रसंग होता, तो मुख्यमंत्री पदाचा होता आणि अशोक गहलोत यांच्या समर्थकांनी सचिन पायलट मुख्यमंत्री होता कामा नयेत म्हणून गेली तीन दिवस काँग्रेस हायकमांड वर दबाव आणला होता. त्याच समर्थकांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष घेतील हा एका ओळीचा प्रस्ताव संमत होऊ दिला नव्हता. त्यामुळे देशभरात आपण मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहू इच्छितो, असा संदेश गेल्याची कबुली अशोक गहलोत यांनी दिली. पण त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री पद मात्र सोडले नाही, उलट नैतिक जबाबदारी म्हणून आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. एक प्रकारे काँग्रेस अध्यक्षपदाचा त्यांनी “त्याग” केला आणि आपला “त्याग” आणि आपल्याच समर्थकांचा दबाव या कात्रीत सोनिया गांधींना अडकवून ते मोकळे झाले.

आता सोनिया गांधी या अशोक गहलोत यांच्या समर्थकांच्या दबावापुढे झुकून त्यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवतील?? की राजकीय धाडस करून अन्य काही निर्णय घेतील?? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

Ashok Gehlot : apologised sonia Gandhi, announced not to contest Congress presidential election, but didn’t quit the chief minister’s post

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात