अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या रेस मधून बाहेर??; करिअरला धक्का की राजकीय चातुर्य??


विशेष प्रतिनिधी

राजस्थान : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याच्या बातम्या आहेत. राजस्थानमधील आपल्या समर्थक आमदारांच्या दबावामुळे ते काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करणार नाहीत, असे त्या बातम्यांमध्ये म्हटले आहे. याचा नेमका राजकीय अर्थ काय?? अशोक गहलोत यांच्या राजकीय करिअरला त्यांच्या समर्थक आमदारांनी धक्का दिला आहे की दस्तुरखुद्द अशोक गहलोत यांचे हे राजकीय चातुर्य आहे??, याचा उलगडा लवकरच होणे अपेक्षित आहे.Ashok Gehlot out of Congress presidential race??; a dash to his political career or his own political intelligence??

पण खरंच जर अशोक गहलोत यांच्यावर समर्थक आमदारांचा दबाव असेल आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली, तर तो त्यांच्या राजकीय करिअरला धक्का मानण्यापेक्षा ते स्वतः अशोक गहलोत यांचे राजकीय चातुर्य मानावे लागेल!!… कारण काहीही झाले तरी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद आणि राजस्थानचे मुख्यमंत्रीपद यातला विद्यमान राजकीय परिस्थितीत “चॉईस” बघितला,



तर कोणीही राजस्थान सारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपदच स्वीकारेल. शेवटी ते एक्झिक्यूटिव्ह आणि राज्याचे सर्वोच्च पद आहे. या उलट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद हे जरी राष्ट्रीय असले, तरी काँग्रेस पक्षाची सध्याची राजकीय अवस्था पाहता ते खरंच “राष्ट्रीय” पातळीवरचे उरले आहे का??, हा गंभीर प्रश्न आहे. शिवाय यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा उरतो. किंबहुना तोच सर्वात महत्त्वाचा आहे,

तो म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कोणतेही काँग्रेसजन “गांधी” नसलेल्या अध्यक्षाच्या पाठीशी तितके मजबुतीने उभे राहतील का??… किंबहुना “गांधी” नसलेल्या अध्यक्षाला काँग्रेसजन स्वीकारतील का??, हा आहे!!… आणि अशा स्थितीत जर अशोक गहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या दबावापोटी खरंच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणूक माघार घेतली, तर राजकीय व्यावहारिक पातळीवर ते त्यांचे चातुर्यच मानावे लागेल!!

किंबहुना समर्थक आमदारांचा “दबाव” हा मुद्दा देखील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वापासून किती “अलग” काढता येईल, हाही प्रश्नच आहे!! कारण शांती धारीवाल यांच्यासारखे नेते जर उघडपणे काँग्रेस हायकमांडने नेमलेल्या सेक्रेटरी इन्चार्जवर थेट आरोप करत असतील, तर त्यामागे “कोणाची शक्ती” असू शकते??, हे समजायला फारसे अवघड नाही!!

याचा आणखी एक अर्थ असा की, अशोक गहलोत यांनी अतिशय चतुराईने काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा काटेरी मधून आपल्या डोक्यापासून दूर ठेवला आहे. कारण राजस्थान “सांभाळणे” सोपे आहे. पण आपण “गांधी” नसताना, म्हणजे गांधी परिवारातले नसताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद “सांभाळणे” आणि त्यावर बसून रिझल्ट देणे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फार फार अवघड आहे. ते अशोक गहलोत यांच्यासारख्या काँग्रेसच्या राजकारणात मुरलेल्या मुरब्बी नेत्याला बाकी कोणी समजावण्याची गरज नाही!!

Ashok Gehlot out of Congress presidential race??; a dash to his political career or his own political intelligence??

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात