करायला गेले मोदींची इमेज डॅमेज, पण इमेज डॅमेज कंट्रोलची काँग्रेसवरच वेळ!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइक असो किंवा बीबीसीची डॉक्युमेंटरी असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इमेज डॅमेज करायला काँग्रेस आणि काही लिबरल घटक गेले खरे, पण प्रत्यक्षात काँग्रेसवरच स्वतःची इमेज डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ आली. Congress tried to damage image of PM Narendra Modi, but Congress leaders had to come forward to control it’s own image damage

त्याचे झाले असे : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत दिग्विजय सिंग यांनी भाषण करताना जोशाच्या ओघात भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक वरच प्रश्नचिन्ह लावले. त्यातून त्यांना मोदींची इमेज डॅमेज करायची होती. पण प्रत्यक्षात दिग्विजय सिंग भारतीय सैन्य दलाच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते झाले. त्यामुळे काँग्रेसलाच ऐन भरत जोडो यात्रेत टीकेचा मारा सहन करावा लागला आणि दस्तूर खुद्द राहुल गांधींना दिग्विजय सिंग यांचे मत खोडून काढण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुढे यावे लागले. राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुढे आले. त्यांनी दिग्विजय सिंह यांचे मत खोडून काढले हे खरे, पण त्यामुळे काँग्रेसची इमेज डॅमेज व्हायचे थांबले नाही. जी इमेज डॅमेज व्हायची ती झालीच. उलट राहुल गांधींना डॅमेज कंट्रोल करता करता नाकी नऊ आले. 

हे थोडे झाले म्हणून की काय ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने मोदी विरोधातली डॉक्युमेंटरी विशिष्ट टायमिंग साधून प्रकाशित केली आणि ती भारतात विशिष्ट गटातून स्क्रीनिंग करण्यात आली, पण यातून मोदींची इमेज डॅमेज होण्यापेक्षा काँग्रेस आणि लिबरल गटाचीच इमेज डॅमेज झाली. कारण काँग्रेस मधला विरोधी सूर ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांच्या रूपाने बाहेर आला. अनिल अँटनी यांनी ट्विट करून बीबीसीच्या डॉक्युमेंटरीला विरोध केला. त्याआधी देखील बीबीसी डॉक्युमेंटरीला ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये असहमती दर्शवली होती.

वास्तविक त्यावरून धडा घेत काँग्रेसने अनावश्यक या डॉक्युमेंटरीच्या फंदात पडायलाच नको होते. पण काँग्रेसचे नेते त्या फंडात पडले. दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ येथे मोदीविरोधातल्या डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग केले ते स्क्रीनिंग केल्यानंतर संघर्ष झाला पण यातून मोदींची इमेज डॅमेज झाली का?, हा खरा प्रश्न आहे. उलट अनिल अँटनी यांच्यासारख्या तरुण नेत्यालाच काँग्रेसला गमवावे लागले. कारण अनिल अँटनी यांनी काँग्रेसची सर्व पदे सोडून दिली आणि शशी थरूर यांना काँग्रेसचे लटके समर्थन करावे लागले. या सर्वांमध्ये काँग्रेस आणि लिबरल गट मोदींची इमेज डॅमेज करायला गेले खरे, पण शेवटी काँग्रेसच्या नेत्यांनाच स्व पक्षाची इमेज डॅमेज कंट्रोल करावी लागली.

Congress tried to damage image of PM Narendra Modi, but Congress leaders had to come forward to control it’s own image damage

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण