Pegasus issue; संसदेत काम रोको; प्रांतांच्या राजधान्यांमध्ये पत्रकार परिषदा; काँग्रेसची राजकीय चाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Pegasus spyware मध्ये खासदार राहुल गांधी हेच टार्गेट असल्याचे दाखवून संसदेत काम रोको आणि देशातल्या प्रांतांच्या राजधान्यांमध्ये मोठ्या पत्रकार परिषदा घेण्याची राजकीय चाल काँग्रेस नेते खेळत आहेत. Congress to hold press conferences in every state tomorrow on the ‘Pegasus Project’ media report. State units of the party will stage protest march to Raj Bhavans across the country on July 22

संसदेत सरकार पूर्ण तयारी करून आले आहे. सरकार ज्या मुद्द्यांवर बोलून बाजी मारून नेऊ शकते त्या मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चाच घडू द्यायची नाही. तर Pegasus spyware मध्ये खासदार राहुल गांधी हेच टार्गेट असल्याचे दाखवून देशभरात आज विविध प्रदेशांच्या राजधान्यांमध्ये पत्रकार परिषदांचा धडाका लावायचा मनसूबा काँग्रेस नेत्यांनी रचला आहे.

काँग्रेसचे लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई, मणिक्कम टागोर, के. सी. वेणूगोपाल यांनी नियम २६७ ची स्थगन प्रस्तावाच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यांना डाव्या पक्षांच्या खासदारांची देखील साथ मिळाली आहे. त्यांनीही लोकसभा आणि राज्यसभेत विविध नियमांखाली स्थगन प्रस्तावाच्या सूचना दिल्या आहेत.तर आम्ही आज पेगासस हेरगिरीचा मुद्दा लावून धरणार असे काँग्रेसचे राज्यसभेतले नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्री अमित शहांनी जे काल ट्विट करून काँग्रेस विकासयात्रा रोखत असल्याची टीका केली होती, तिलाही खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

त्याच वेळी राज्यांच्या राजधान्यांमध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते जाऊन उद्या दिवसभर पत्रकार परिषदांचा धडाका लावणार आहेत. यातून फक्त राजधानी दिल्लीतच नाही, तर प्रत्येक राज्यांमधल्या स्थानिक भाषांमधल्या माध्यमांमधून काँग्रेसचा पेगासस हेरगिरीचा मुद्दा पेटवून द्यायचा इरादा स्पष्ट झाला आहे. तसेच २२ जुलै रोजी सर्व राज्यांच्या राजभवनांपर्यंत काँग्रेसचे नेते मोर्चे काढणार आहेत.

Congress to hold press conferences in every state tomorrow on the ‘Pegasus Project’ media report. State units of the party will stage protest march to Raj Bhavans across the country on July 22

महत्त्वाच्या बातम्या