ज्ञानवापी मशीद : सर्वेक्षणाला काँग्रेसचा विरोध; 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्यावर ठाम!!


वृत्तसंस्था

उदयपूर : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाला काँग्रेसने विरोध केला आहे. पक्षाच्या उदयपुर मध्ये सुरू असलेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी पक्षाची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे. काँग्रेस पक्ष 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याबाबत ठाम आहे, असे त्यांनी सांगितले आहे. Congress opposes survey; Insist on the 1991 Prayer Place Act

सध्या ज्ञानवापी मशिदीचे वाराणसी कोर्टाच्या आदेशानुसार व्हिडिओग्राफी सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी 3 कोर्ट कमिशनर देखील नेमले आहेत. हिंदू-मुस्लिम दोन्ही पक्ष, उत्तर प्रदेश प्रशासन आणि वकील अशी 51 जणांची टीम ज्ञानवापी मशीद आणि तिचे तळघर याचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करत आहे.

या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंदू – मुस्लीम वादासंदर्भात चिदंबरम यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने प्रार्थनास्थळ कायदा मंजूर केला होता. त्यामध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीचा अपवाद केला होता. मात्र, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी देशातल्या सर्व प्रार्थना स्थळांची स्थिती जशी असेल तशीच ठेवण्याचा निर्णय या कायद्यानुसार घेतला होता.

काँग्रेस पक्ष सन 2022 मध्ये या कायद्यावर ठाम आहे. कोणत्याही प्रार्थना स्थळाचे “सध्याचे स्टेटस” बदलण्याच्या विरोधात आहे कारण तसे केल्यास देशात फार मोठा संघर्ष उद्भवेल, असा इशारा चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर आता बाकीच्या राजकीय पक्षांची अधिकृत भूमिका काय हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.

Congress opposes survey; Insist on the 1991 Prayer Place Act

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”