विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूंपाठोपाठ आता राहुल आणि प्रियांका गांधी यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कॉग्रेसने त्यांना आता फार महत्व न देण्याचे धोरण स्वीकारले आहे.Congress not giving demand for Amrindar
विचारसरणीच्या लढाईत ज्यांना साथ सोडायची असेल त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, असा सूचक इशारा कॉंग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना दिला असून राजकारणात राग, ईर्षा, द्वेष, सूड या भावनांना स्थान नाही, असा सल्लाही दिला आहे.
यावर प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, की वयोवृद्ध लोकांना लवकर राग येतो आणि त्या रागाच्या भरात ते बरेच काही बोलून जातात. त्यांच्या रागाचा, वयाचा आणि अनुभवाचा आदर आहे. ते समजूतदारपणा दाखवतील आणि पुनर्विचार करतील.
त्यांनाही राजिंदरकौर भट्टल यांच्या जागेवर मुख्यमंत्री बनविण्यात आले होते आणि ते नऊ वर्षे नऊ महिने मुख्यमंत्री राहिले. सार्वजनिक जीवनात अशा प्रकारचे वक्तव्य त्यांना शोभत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App