पंतप्रधानांच्या सुरक्षेवर काँग्रेसींचे विचार : काँग्रेस नेते श्रीनिवास म्हणाले- मोदीजी, हाऊज द जोश; तर युवक काँग्रेस म्हणते – हे कर्माचे फळ!

Congress leaders views on PM Modi security Laps, Congress leader Srinivas BV said- Modiji Hows Josh; So the Youth Congress says - this is karma

 PM Modi security Laps : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबच्या फिरोजपूर येथे बुधवारी होणारी सभा सुरक्षेच्या गंभीर त्रुटीमुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर भटिंडा विमानतळावर परतलेल्या पीएम मोदींनी अधिकाऱ्यांना म्हटले की, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंत परतू शकलो. यानंतर भाजपने काँग्रेस सरकारवर कटाचा आरोप केला. दुसरीकडे, काँग्रेस नेत्यांकडूनही वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. Congress leaders views on PM Modi security Laps, Congress leader Srinivas BV said- Modiji Hows Josh; So the Youth Congress says – this is karma


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबच्या फिरोजपूर येथे बुधवारी होणारी सभा सुरक्षेच्या गंभीर त्रुटीमुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर भटिंडा विमानतळावर परतलेल्या पीएम मोदींनी अधिकाऱ्यांना म्हटले की, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंत परतू शकलो. यानंतर भाजपने काँग्रेस सरकारवर कटाचा आरोप केला. दुसरीकडे, काँग्रेस नेत्यांकडूनही वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी पंतप्रधानांना प्रश्न केला, “मोदीजी हाऊज जोश.” यानंतर युवक काँग्रेसनेही त्याच धर्तीवर “हे कर्माचे फळ आहे,” असे ट्विट केले. एकीकडी स्वत: सीएम चन्नी यांनी दावा केलाय की, सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती, तर पीएम मोदी हेलिकॉप्टरने येणार होते, पण अखेरच्या क्षणी त्यांनी रस्ते मार्गाने येण्याचे ठरवले. खरे तर, पीएम मोदी रस्ते मार्गाने जाण्याआधी तो मार्ग सुरक्षित असल्याची खात्री पंजाबच्या डीजीपींनी दिली होती. तरीही तेथपर्यंत आंदोलक पोहोचले, जवळजवळ 20 मिनिटे देशाच्या पंतप्रधानांचा ताफा तेथे अडकलेला होता.

पीएम मोदींच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटीवर काँग्रेसींचे विचार

सुरजेवाला म्हणतात- खुर्च्या रिकाम्या, म्हणून सभा रद्द

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत पंजाब सरकारला घेरले असताना रणदीप सुरजेवाला यांनी त्यांना क्रोधित होऊ नका असा सल्ला दिला. सुरजेवाला यांनी ट्विट केले, “तुमचा संयम गमावू नका. फक्त लक्षात ठेवा की, पंतप्रधानांच्या रॅलीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. SPG आणि इतर एजन्सींच्या सहकार्याने सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मार्ग वळवण्यात आले होते. हरियाणा आणि राजस्थान येथून येणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांसाठी मार्गही वळवण्यात आले होते. रॅली रद्द होण्याचे कारण रिकाम्या खुर्च्या आहे. विश्वास बसत नसेल तर बघा.”

श्रीनिवास बीव्ही यांनी उडवली पीएम मोदींची खिल्ली

श्रीनिवास यांनी ट्विट केले आहे की, “750 शेतकऱ्यांच्या हौतात्म्याने जे लोक खवळले नाहीत. ज्या पंतप्रधानांनी देशाच्या अन्नदात्या त्याच्या दुर्दशेवर सोडून दिले आणि कधीही भेटले नाहीत. आज रिकाम्या खुर्च्यांमुळे रॅली रद्द झाल्यामुळे ते सर्वजण दुःखी आहेत. ना दुल्हा आया, ना बाराती आए और न शहनाई बज पाई.”

युवक काँग्रेसचे ट्वीट, कर्माचे फळ!

मोदींची रॅली रद्द झाल्याबद्दल युवक काँग्रेसने ट्विट केले की, तुम्ही शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर येण्यापासून रोखले. ते हेच कर्माचे फळ आहे.

पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीवर काँग्रेसकडून आनंद का साजरा होतोय?

काँग्रेस काही नेते हे पीएम मोदींच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चुकीवर आनंद का व्यक्त करत आहेत, असा परखड सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्या म्हणाल्या की, जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीवर काँग्रेस आनंद साजरा करत आहे. मोदीजी हाऊज जोश, अशी त्यांची विधाने आहेत. द्वेष मोदींचा आहे, मात्र देशाच्या पंतप्रधानांच्या केसालाही धक्का लावणाऱ्या षडयंत्राला देश साथ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी सवाल केले की, सुरक्षा तपशील कोठे लीक झाले? वारंवार विचारणा करूनही पंतप्रधानांच्या सुरक्षेला प्रतिसाद का देण्यात आला नाही? काँग्रेस आता पंतप्रधानांच्या सुरक्षा भंगाचा आनंद का साजरा करत आहे?

Congress leaders views on PM Modi security Laps, Congress leader Srinivas BV said- Modiji Hows Josh; So the Youth Congress says – this is karma

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था