सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील बंगल्यात व्हावे लागले स्थलांतरित
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज (22 एप्रिल) तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यातून बाहेर पडले. 14 एप्रिल रोजीच राहुल गांधींनी त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान शासकीय बंगल्यातून त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी हलवले होते. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे उर्वरित सामान बंगल्यातून हलवण्यात आले होते. हा बंगला त्यांना खासदार म्हणून देण्यात आला होता. Congress leader Rahul Gandhi hands over his official bungalow at Tughlak Lane
जवळपास दोन दशकांपासून ते या बंगल्यात राहत होते. सूत्रांनी सांगितले की, त्यांचे कार्यालय बदलल्यानंतर ते आधीच त्यांची आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या १०, जनपथ या निवासस्थानी राहू लागले आहेत.
#WATCH | Delhi: Congress leader Rahul Gandhi hands over his official bungalow, at Tughlak Lane, in the presence of Former Congress president Sonia Gandhi & party General Secretary Priyanka Gandhi Vadra and KC Venugopal. (Source: AICC) pic.twitter.com/m9Utx0X0F4 — ANI (@ANI) April 22, 2023
#WATCH | Delhi: Congress leader Rahul Gandhi hands over his official bungalow, at Tughlak Lane, in the presence of Former Congress president Sonia Gandhi & party General Secretary Priyanka Gandhi Vadra and KC Venugopal.
(Source: AICC) pic.twitter.com/m9Utx0X0F4
— ANI (@ANI) April 22, 2023
२३ मार्च रोजी सूरतमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्यास सांगितले होते. सुरत न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला राहुल गांधी यांनी आव्हान दिले होते, ज्याने शिक्षा रद्द करण्याची त्यांची अपील फेटाळली. आता सत्र न्यायालयाच्या आदेशाला पुढील आठवड्यात गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App