विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील माळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियममध्ये सहाव्या रोल बॉल विश्वकरंडक स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन उच्चतंत्र आणि शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सुरुवातीलाच पुरुष गटात भारताने विजयी सलामी दिली. Roll Ball World Cup Tournament started In Pune India Make A Winning Start
भारतीय संघाने पोलंड संघाला १४-१ अशा फरकाने पराभूत केले. तर महिला गटात इजिप्तच्या संघाने नेपाळच्या संघाला ३-० असे पराभूत करत स्पर्धेत खाते उघडले. भारताकडून आकाश गणेशवाडे, हर्षल घुगे, सचिन सैनी मिहीर साने, श्रीकांत साहू, विकी सैनी यांनी चमकदार खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला. पुण्यातील एमईएस बालशिक्षण मंदिर या शाळेत क्रीडा शिक्षक असणारे राजू दाभाडे यांनी २००४ मध्ये हा खेळ शोधून काढला. लहानपणापासूनच स्केटिंगमध्ये मास्टर असलेले राजू दाभाडे यांना रोलर स्केट सोबत काहीतरी वेगळं करायचं होतं, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि पुण्यात रोल बॉल या खेळाचा जन्म झाला.
२००३मध्ये सर्वप्रथम रोल बॉल जगासमोर सादर करण्यात आला आणि त्यानंतर इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशनची स्थापना झाली. सध्या राजू दाभाडे हे या संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांना राजा मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
https://youtu.be/bZx5X-J_jHQ
रोल बॉल हा स्केटिंग, बास्केटबॉल, थ्रो बॉल, आणि हँडबॉल या तिन्ही खेळांचं मिश्रण म्हणता येईल. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. सहा मैदानावर असतात तर सहा राखीव असतात. दोन्ही संघाचे उद्दिष्ट हे २५ मिनिटांत जास्तीत जास्त गोल करणे असतं.
४० पेक्षा अधिक देशात हा खेळ खेळला जात आहे
रोल बॉल हा आशिया खंडात मोठ्याप्रमाणावर खेळला जाणारा खेळ ठरतोय. या खेळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आजघडीस ४० पेक्षा अधिक देशात हा खेळ खेळला जात आहे. आतापर्यंत या खेळाच्या पाच विश्वचषक स्पर्धा पार पडल्या आहेत. त्यापैकी तीन विश्वषचषक भारताच्या नावावर आहेत. आता हा खेळ ऑलिंम्पिकमध्ये खेळला जावा यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. बुद्धीबळ, कबड्डी, खो-खो यानंतर रोल बॉल हा या दशकातील पहिला भारतीय कंटेम्प्टनरी स्पोर्ट्स म्हणून ओळखला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App