लखनऊ आग्रा एक्स्प्रेस वेवर पून्हा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबियास भेटण्यापासून रोखण्यात आले


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : जगदीशपूरा पोलीस स्टेशन मध्ये संशयित आरोपीच्या मृत्यु नंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना लखनऊ आग्रा एक्स्प्रेसवेबवर रोखण्यात आले आहे. सीआरपीसी कलम 144 लागू असल्याने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती लखनऊ पोलिसांद्वारे मिळाली आहे.

Congress leader Priyanka Gandhi again barred from visiting victim’s family on Lucknow-Agra Expressway

तर नेमके प्रकरण काय आहे?

नुकतीच एक चोरीची बातमी आली होती. जगदीशपूरा येथील पोलिस स्टेशनमधून 25 लाखांची चोरी झाली आहे. ह्या घटने नंतर अरूण वाल्मिकी नावाच्या व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. आता अशी बातमी आली आहे की, संशयीत आरोपी अरुण वाल्मिकी चे पोलिस स्टेशनमध्ये निधन झाले आहे.


Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप


मोनिराज जे आग्रामधील सीनियर सुप्रीटेण्डंट ऑफ पोलिस आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री अरुण अचानक आजारी पडला. त्या नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. दरम्यान त्याच्या घरी आम्ही रेड देखील टाकली होती, असे ते म्हणाले होते.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व प्रकरणानंतर प्रियांका गांधी यांनी अतिशय तीव्र शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणतात, मी जिथे जाते तिथे मला थांबवण्यात येते. तुमची अशी इच्छा आहे का, मी फक्त रेस्टॉरण्टमध्ये बसावे? जर पोलीस स्टेशनमध्ये कोणाचे निधन झाले आहे, तर तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कसा काय असू शकतो? अश्या तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Congress leader Priyanka Gandhi again barred from visiting victim’s family on Lucknow-Agra Expressway

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात