विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्याचा निवडणूक आयोगच बरखास्त करावा अशी मागणी काँग्रेसने केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांच्या नियुक्ती पात्रतेचे निकष ठरवावे, अशी मागणी केली आहे. congress lashes on election commission
कॉंग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, की आयोगावरील सदस्यांच्या वर्तनाची चौकशी होणे आवश्यक आहे. आयोगाने मतदारांचा विश्वासघात करून स्वतःला बदनाम केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीबाबत, आयोगातील सदस्यांची संख्या आणि पात्रतेचे निकष काय असावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाल द्यावा. आयोगाने निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे काम करावे यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे देखील न्यायालयाने ठरवावी.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App