कॉँग्रेस आता देशव्यापी पक्ष नाही, प्रादेशिक पक्षांनाच आता भाजपविरोधी दुसरी आघाडी तयार करावी लागेल, सुखबिरसिंग बादल यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉँग्रेस आता देशव्यापी पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाविरुध्द आघाडी तयार करायला हवी असे आवाहन शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी केले आहे. ही तिसरी आघाडी नव्हे तर दुसरी आणि प्रमुख आघाडी असेल असेही त्यांनी म्हटले आहे.Congress is no longer a nationwide party, only regional parties will have to form another anti-BJP front, appeals Sukhbir

बादल म्हणाले, लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. याचे कारण म्हणजे प्रदेशिक पक्ष हे लोकांशी चांगल्या पध्दतीने जोडले गेले आहेत. त्यांना लोकांची नस माहित आहे. त्यामुळेच भाजपाच्या विरोधात सशक्त पर्याय म्हणून प्रादेशिक पक्षांची दुसरी आघाडी तयार व्हायला हवी.



पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केल्यावर सुखबीरसिंग बांदल यांनी हे वक्तव्य केले आहे. ममता बॅनर्जी यांनीही भाजपाला देशातून उखडून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती.

भारतीय जनता पक्षाशी गेल्या अनेक दशकांपासूनची युती तोडल्याचे कारण सांगताना बादल म्हणाले, अकाली दल हा एक शेतकरी पक्ष आह. शेतकºयांचे कल्याण ही आमच्या पक्षाची मुख्य विचारधारा आहे. त्यामुळे शेतकºयांसाठी आम्हाला कितीही किंमत मोजावी लागेल.

आम्ही हे कायदे पंजाबमध्ये लागू करू देणार नाही.अकाली दल सत्तेवर आल्यास शेतकरी कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल. शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकºयांच्या मुलांना सरकार मोफत शिक्षण आणि तरुण शेतकऱ्यांच्या पालकांना निवृत्तीवेतन देईल. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिलांना उभे करण्याचा प्रयत्न करेल.

शिरोमणी अकाली दलासोबत आम आदमी पक्षाची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आपचे प्रवक्ते राघव चड्डा यांनी त्याचा इन्कार केला. यावर चड्डा यांचे वक्तव्य राजकीय दृष्टया अपरिपक्वपणाचे असल्याचे शिरोमणी अकाली दलाने म्हटले आहे.

Congress is no longer a nationwide party, only regional parties will have to form another anti-BJP front, appeals Sukhbir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”