संघाला प्रत्युत्तर देणारी काँग्रेसची फौज मैदानात उतरणार… पण समर्थन फक्त नेहरू – गांधींचे करणार…!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या प्रत्येक मुद्द्याला जोरकसपणे उत्तर देण्यासाठी मोठी फौजच्या फौज काँग्रेस तयार करणार आहे. पण संघाने आणि भाजपने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या कॅडरला प्रत्यक्षात नेहरू – गांधींच्या समर्थनासाठी मैदानात उतरवले जात आहे.Congress distributing booklets propagating Nehru – Gandhi among its cadres

उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष संघाची कार्यपद्धती अवलंबून कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांना स्वतंत्र पुस्तिकाही वाटल्या जात आहेत. या पुस्तिकांमध्ये संघ आणि भाजपने काँग्रेस विषयी चालवलेल्या प्रपोगंडाचे उत्तर देण्यात आल्याचे काँग्रेस नेते सांगतात.पंडित नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान होऊ दिले नाही, सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर देशापुढे कोणतीच समस्या उरली नसती, प्रख्यात क्रांतिकारक भगतसिंग यांची फाशी रोखण्यासाठी गांधी-नेहरूंनी काहीही केले नाही, काश्मीरचा प्रश्न पंडित नेहरू यांच्यामुळेच चिघळला, देशाने गेल्या सत्तर वर्षात काहीच प्रगती केली नाही वगैरे राजकीय प्रपोगंडा संघ आणि भाजप पसरवत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

या प्रत्येक आरोपाला “ही पहा वस्तुस्थिती” असे सांगून या पुस्तिकेत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका वाचून संघाच्या आणि भाजपच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने आपले केडर मजबूत करण्याची पावले टाकली आहेत. काँग्रेसला वैचारिक निष्ठावंत कार्यकर्ते हवे आहेत आणि हे तयार करण्याची प्रक्रिया संघासारखी अवलंबली तर आपल्याला उपयोग होऊ शकेल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते आहे

त्यातूनच या पुस्तिकेचे विषय समोर आले आहेत. या पुस्तिकेत 14 प्रकरणे असून संघ आणि भाजपने काँग्रेस विषयी चालवलेल्या प्रपोगंडाची उत्तरे असल्याचा दावा करण्यात आला आहे. एक प्रकारे हे फक्त नेहरू -/गांधींचे समर्थन असल्याचेही या पुस्तिकेतून स्पष्ट दिसून येत आहे.

Congress distributing booklets propagating Nehru – Gandhi among its cadres

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय