विशेष प्रतिनिधी
मुंबई:कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार केआर रमेश कुमार यांनी महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केले आहे. त्यांनी विधानसभेत म्हटले की, जेव्हा बलात्कार थांबवता येत नाहीत तेव्हा झोपा आणि आनंद घ्या .आश्चर्य म्हणजे काँग्रेस आमदाराच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्याऐवजी विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी खळखळून हसायला लागले.CONGRESS CONTROVERSY: Outrageous! Karnataka Congress senior leader Ramesh Kumar said in the assembly – ‘Enjoy the rape’; Women Congress leaders were outraged
धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस नेत्याने केलेल्या वक्तव्याला कुणीही विरोध केला नाही. एवढंच नव्हे तर या विधानावर विधानसभेत एकच हसा पिकला. वास्तविक, कर्नाटकातील पूर आणि पिकांचे झालेले नुकसान याबाबत चर्चा आमदार करत होते.
यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभापतींनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ कमी झाला नाही. यानंतर सभापती हेगडे म्हणाले, ‘रमेश कुमार, तुम्हाला माहिती आहे, आता मला वाटते की मी या परिस्थितीचा आनंद घ्यावा.
मी ठरवले आहे की आता मी कोणालाच रोखून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करणार नाही. तुम्ही लोक चर्चा करा.यावर काँग्रेसचे आमदार रमेश कुमार म्हणाले, ‘एक जुनी म्हण आहे… जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि आनंद घ्या . तुमची अवस्था आता अगदी तशीच झाली आहे.
The House shall apologise to entire womanhood, every mother, sister & daughter of this nation for such an obnoxious & shameless behaviour @INCIndia @INCKarnataka @BJP4India @BJP4Karnataka @MahilaCongress @BJPMahilaMorcha pic.twitter.com/wPKbnxJlnp — Dr. Anjali Hemant Nimbalkar (@DrAnjaliTai) December 16, 2021
The House shall apologise to entire womanhood, every mother, sister & daughter of this nation for such an obnoxious & shameless behaviour @INCIndia @INCKarnataka @BJP4India @BJP4Karnataka @MahilaCongress @BJPMahilaMorcha pic.twitter.com/wPKbnxJlnp
— Dr. Anjali Hemant Nimbalkar (@DrAnjaliTai) December 16, 2021
माफी मागायला हवी-
काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सभागृहातील महिलांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे आणखी एक आमदार सौम्या रेड्डी यांनीही हे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
वृंदा अडिगे म्हणाल्या, ‘जिथे महिला मतदारांनीच त्यांना पाठवले आहे, त्या विधानसभेत अशा गोष्टी किती लज्जास्पद आहेत. बलात्कार हा महिलांवरील सर्वात घृणास्पद, क्रूर आणि हिंसक गुन्हा आहे हे त्यांना माहीत नाही का? कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आमची मागणी आहे की, आमदाराला निलंबित करून निवडणुकीत उभे राहू नये म्हणून त्यांना तिकीट देऊ नये. लोकशाहीत हे सर्व मान्य नाही.
असे विधान यापूर्वीही-
रमेश कुमार यांनी अशी असंवेदनशील टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये, जेव्हा रमेश कुमार विधानसभेचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की मला ‘बलात्कार पीडिता’सारखे वाटते. ते म्हणाले होते, ‘माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे.
बलात्कार एकदाच होतो. तुमच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केल्यावर आरोपीला तुरुंगात टाकले जाते. त्याचे वकील विचारतात की हे कसे झाले? हे कधी आणि किती वेळा घडले? बलात्कार एकदाच होतो पण कोर्टात १०० वेळा होतो. अशी माझी अवस्था आहे.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App