संसदेत संविधान दिन बहिष्कारावर घडविले काँग्रेसने विरोधकांचे “पहिले” ऐक्य!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. काँग्रेस सर्व विरोधकांचे ऐक्य घडवेल, असे कालच उच्चरवाने जाहीर करणाऱ्या नेत्यांनी आज संविधान दिनाच्या संसदेतल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधी पक्षांचे पहिले ऐक्य घडवून दाखविले. संसदेतल्या संविधान दिन कार्यक्रमावर काँग्रेससह 14 पक्षांनी बहिष्कार घातला आहे. Congress boycotts Constitution Day in Parliament, “first” unity of the opposition !!

संसदेत संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणाऱ्या पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, इंडियन युनियन मुस्लिम लीग, एआयएमआयएम आदी पक्षांचा समावेश आहे.



संविधान दिन हा मोदी सरकारचा कार्यक्रम असल्याने त्यावर बहिष्कार घालत असल्याचे सर्व विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. बहिष्काराचा कार्यक्रम काँग्रेस नेत्यांनी काल रात्री ठरविला. त्यानंतर या नेत्यांनी संपर्क साधला. यापैकी 14 पक्षाच्या नेत्यांनी संविधान दिन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यास मान्यता दिली. त्यामुळे संशयित अकरा वाजता सुरू होणार या कार्यक्रमामध्ये चौदा विरोधी पक्षांचे खासदार उपस्थित राहणार नाहीत.

या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिरला संबोधित करणार आहेत. संविधान दिनाचा कार्यक्रम मोदी सरकारने पहिल्या सत्ताकाळात 2015 पासून सुरू केला. त्यानंतर सलग सहा वर्षे सर्व विरोधी पक्ष यात सहभागी होत होते. परंतु यंदा 2021 मध्ये प्रथमच 14 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.

Congress boycotts Constitution Day in Parliament, “first” unity of the opposition !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात