कोलकत्यातील दहशतवादी ‘अल कायदा’शी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा


वृत्तसंस्था

कोलकाता – प.बंगालची राजधानी कोलकात्यात अटक केलेले नव-जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी)चे तीन दहशतवादी दहशतवादी कटाची आखणी करत होते. ते अल-कायदा आणि हरकत-उल-जिहाद-इस्लामी या दहशतवादी संघटनेशी संबधित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. colcatta terrorist linked with al quiada

प.बंगालच्या काही जिल्ह्यांत त्यांचे सहकारी असू शकतात, असे कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, की प्राथमिक चौकशीनुसार हे दहशतवादी पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी कट आखत होते.



त्यांच्याकडील कागदपत्रावरून ते अल-कायदा आणि हरकत-उल-जिहाद-इस्लामी या दहशतवादी संघटनेशी संबंधित असू शकतात. पोलिसांनी रविवारी (ता. ११) नज्जूर रेहमान, रबीऊल इस्लाम आणि साबीर या तीन दहशतवाद्यांना दक्षिण कोलकात्यातून अटक केली होती. बांगलादेशी नागरिक असलेल्या या तिघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भाड्याने खोली मिळविली होती. त्यांना मदत करणाऱ्या सलीम मुन्शीने ज्येष्ठ व्यक्तीच्या ओळखपत्राच्या मदतीने नज्जूरचे बनावट ओळखपत्र तयार केले.

त्यानंतर, नज्जूरने जयराम व्यापारी नाव धारण करून ज्येष्ठ व्यक्तीला वडिल म्हणून दाखविले. मुन्शीने बांगलादेशातून भाऊ येणार असून त्याला रिक्षाचा परवाना देण्याच्या बहाण्याचे ज्येष्ठाकडून ओळखपत्र घेतले, असेही त्यांनी नमूद केले.

colcatta terrorist linked with al quiada

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण