बंगळूरमध्ये ५४२ लहान मुलांना कोरोना, तिसऱ्या लाटेची लोकांना भीती


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये गेल्या दहा दिवसांत शहरात एकूण ५४२ मुलांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याने पालकवर्गात अस्वस्थता पसरली आहे. बाधित मुलांना घरांमध्ये ठेवण्यात आले असून, प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. 500 children facing corona in Bangalore

बृहन्बंगळूर महापालिकेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ४ जुलैपासून ५४२ मुले कोविड संसर्गाने बाधित ठरले आहेत. यापैकी २२५ मुली आणि ३१७ मुले आहेत. आरोग्यधिकाऱ्यांनी नवजात बालक, नऊ वर्षांची मुले आणि १० ते १९ वर्षांच्या मुलांचे वयाच्या आधारे सर्वेक्षण करून त्यांचे विश्लेषण केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ५४२ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.गेल्या १० दिवसांपासून बंगळूर विभागात ४,७८९ लोकांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यापैकी ५४२ मुलांना संसर्ग झाल्याने चिंता वाढली आहे. तथापि, या वयातील मुलांना त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली ठेवले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवजात बालकांपासून ते नऊ वर्षांच्या मुलांपर्यंत एकूण १७४ मुलांना कोविड संसर्गाचे निदान झाले आहे. तथापि, पालकांच्या देखरेखीखालीच मुलांना ठेवले आहे. तरीसुद्धा संसर्गाचे प्रमाण वाढल्याने लोकांमधील भीती चिंताजनक आहे. १० ते १९ वर्षे वयोगटातील ३६८ मुलांना कोविडची पुष्टी केली गेली आहे.

500 children facing corona in Bangalore

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*