विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : २०२०-२१ या वर्षात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामध्ये आयटी क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळे जॉबच्या शोधात असलेले फ्रेशर्सदेखील अडचणीत आले आहेत. आयटी क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या फ्रेशर्ससाठी एक दिलासादायक बातमी आहे. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी कॉग्निझंटने यावर्षी २८ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली आहे. Cognizant to hire 28,000 Indian freshers this year
गेल्या वर्षी २०२०मध्ये १७ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. यंदा यात १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. कॉग्निझंटच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ९६ हजार ५०० एवढी आहे. त्यापैकी दोन लाखाहून अधिक कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत.
गेल्या काही महिन्यात कंपनीतील कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ही झीज आम्हाला भरून काढायची आहे. भारतात नोटीस पीरियड दोन महिन्यांचा होता. त्यामुळे यंदा भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे.
कंपनी मल्टी-पार्ट योजना राबवित आहे. ज्यामध्ये करियरच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरचा आणखी विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक पदोन्नतीच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे आणि महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही एक चांगली संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App