सिद्धूंच्या पाकशी संबंधांचे अमरिंदर यांचे जाहीर आरोप, काश्मीरचे माजी डीजीपी म्हणतात, काँग्रेसने गांभीर्याने घ्यावे अन्यथा…

CM Amrinder Accused Navjot Sidhu For His Pakistan Relations Many Leaders Questioned Congress High Commond

CM Amrinder Accused Navjot Sidhu : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीची देशभरात चर्चा सुरू आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये बंडाळी माजल्याने कॅप्टन अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर यांनी त्यांच्याविरोधात कारस्थान रचणारे नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कॅप्टन जाहीरपणे म्हणाले की, सिद्धूंचे पाकिस्तानशी, तिथल्या लष्काराशी संबंध आहेत. त्यांच्यामुळे सुरक्षेला मोठा धोका आहे. CM Amrinder Accused Navjot Sidhu For His Pakistan Relations Many Leaders Questioned Congress High Commond


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीची देशभरात चर्चा सुरू आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये बंडाळी माजल्याने कॅप्टन अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर यांनी त्यांच्याविरोधात कारस्थान रचणारे नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कॅप्टन जाहीरपणे म्हणाले की, सिद्धूंचे पाकिस्तानशी, तिथल्या लष्काराशी संबंध आहेत. त्यांच्यामुळे सुरक्षेला मोठा धोका आहे.

कॅप्टन अमरिंदर यांच्या याच वक्तव्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण आता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नवज्योतसिंग सिद्धू यांचेही नाव आहे. मग प्रश्न असा आहे की, कॅप्टन अमरिंदर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने असे गंभीर आरोप जाहीरपणे करूनही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल का घेतली नाही?

हाच धागा पकडून जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी शेष पौल वैद्य म्हणतात की, “जेव्हा पंजाबचे माजी मुख्यमंत्री सिद्धूंवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा आरोप करत आहेत तेव्हा काँग्रेसने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. जर काँग्रेसने अद्यापही त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले, तर केंद्र सरकारने संवेदनशील सीमा राज्य म्हणून हस्तक्षेप करावा आणि राष्ट्रपती राजवट त्वरित लागू करावी.”

दुसरीकडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही याच मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जावडेकर म्हणाले की, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना देशद्रोही म्हटले आहे. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. भाजप काँग्रेसला एकच प्रश्न विचारत आहे की, सोनिया, राहुल आणि प्रियांका यावर गप्प का आहेत? आम्ही काँग्रेसला या विषयावर बोलण्याची आणि आपली भूमिका मांडण्याची मागणी करतो. काँग्रेस या आरोपांची दखल घेऊन कारवाई करेल का?”

CM Amrinder Accused Navjot Sidhu For His Pakistan Relations Many Leaders Questioned Congress High Commond

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण