अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक : 40 फूट उंचीची वीणा उभारली; मोदींनीही जागवल्या आठवणी


उत्तर प्रदेशातील अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर असलेल्या नयाघाट चौक आता ‘लता मंगेशकर’ चौक म्हणून ओळखला जाणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर असे नाव देण्यात आलेल्या स्मृती चौकाचे बुधवारी मुख्यमंत्री योगी यांनी लोकार्पण केले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, लतादीदी यांचे पुतणे आदिनाथ मंगेशकर आणि लतादीदींच्या सूनबाई यांची उपस्थिती होती.Chowk named after Lata Mangeshkar in Ayodhya 40 feet high veena erected; Modi also awakened memories

त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओद्वारे संदेश दिला. PM मोदी म्हणाले की, लता दीदी मॉ सरस्वतीच्या साधिका होत्या. त्यांच्या आवाजाने संपूर्ण जग जोडले गेले. राम मंदिराच्या उभारणीने लतादीदी खूश झाल्या होत्या.



गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज 93 वी जयंती आहे. चौकाचे उद्घाटन करण्यापूर्वी लतादीदींना अभिवादन करण्यात आले. यानंतर लतादीदींचे पुतणे आदिनाथ मंगेशकर आणि सून कृष्णा मंगेशकर यांनी स्वागत केले. लतादीदींनी गायलेली भजने महाराष्ट्रातील गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केले.

लतादीदींच्या नावाने विद्यापीठही उघडणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याप्रसंगी बोलताना म्हणाले की, लतादीदी यांच्या दिवसाची सुरूवात श्रीरामाच्या पूजेने होते असे. हा चौक असणे म्हणजे जागतिक विक्रमच आहे. लतादीदींच्या नावाने विद्यापीठही उघडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अयोध्येचा विकास झपाट्याने होत असून यातून विशेष म्हणजे पर्यटन आणि आध्यात्मिक दृष्टीने विकास होऊ लागलेला आहे, असे ही सीएम योगी यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की- 5 वर्षांत यूपी पर्यटनाच्या क्षेत्रात नवीन उंची गाठणार आहे.

30 दिवसांत 8.50 कोटींचा खर्च करून चौक उभारला

लता मंगेशकर चौकाचे बांधकाम दाखवण्यासाठी लघुपटही दाखवण्यात येणार आहे. सुमारे 8.50 कोटी रुपये खर्चून 30 दिवसांत हा चौक बांधण्यात आला आहे. अयोध्या शोध संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या रामायणाच्या ग्लोबल एनसायक्लोपीडियाच्या 11 पुस्तकांचेही याप्रसंगी प्रकाशन झाले.

चौकाची वैशिष्ट्ये

  • ​​​​​​8.50 कोटी खर्चून लता मंगेशकर चौक बांधण्यात आला आहे.
  • स्मृती चौकात लता मंगेशकर यांनी गायलेली भजनं गुंजणार आहेत.
  • माँ शारदाचा वीणा सूर हीच गानसम्राज्ञी चौकाची ओळख असेल.
  • वीणाची लांबी 10.8 मीटर आणि उंची 12 मीटर आहे.
  • 14 टन वजनाची वीणा बनवण्यासाठी 70 लोक लागले.
  • वीणा एका महिन्यात कांस्य आणि स्टेनलेस स्टीलपासून बनवली गेली.
  • त्यावर सरस्वती आणि मोराची चित्र कोरलेली आहेत.
  • पद्म पुरस्कारप्राप्त राम सुतार यांनी वीणाची रचना केली.
  • वीणासोबत इतर शास्त्रीय वाद्येही प्रदर्शनात आहेत.
  • चौकात लतादीदींचे जीवन आणि व्यक्तिमत्त्व चित्रित केले आहे.
  • चौकात सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत

28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चौकाचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी लता मंगेशकर चौकात उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित एक प्रदर्शनही येथे लावण्यात आले आहे. सीएम योगी या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार असून, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डीही असतील.

Chowk named after Lata Mangeshkar in Ayodhya 40 feet high veena erected; Modi also awakened memories

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात