विशेष प्रतिनिधी
बीजिंग : मंगळ ग्रहावर गेल्या आठवड्यात उतरलेल्या चीनच्या झुराँग या बग्गी (रोव्हर)ने प्रथमच काढलेली छायाचित्रे चीनने प्रसिद्ध केली आहेत. ‘झुराँग’ने काढलेल्या मंगळाच्या छायाचित्रांचे कौतुक अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’नेही केले आहे. Chinas rover send images from mars
‘नासा’चे प्रशासक बिल नेल्सन यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर ‘सीएनएसए’चे अभिनंदन केले आहे. ते म्हणतात, ‘झुराँग’मुळे मंगळाबद्दल जास्त माहिती मिळू शकेल. भविष्यातील आंतरराष्ट्रीय शोधांतून या ग्रहावर मानवाला उतरविण्यांसाठी मदत होऊन त्यादृष्टीने तयारी करणे शक्य होईल.
‘झुराँग’च्या कृष्णधवल छायाचित्रांत मंगळावरील विस्तीर्ण भूभाग ज्याला युटोपिया प्लॅनिटिया’ म्हणतात तो दिसत आहे. तसेच ग्रहाची क्षितिज रेषाही स्पष्ट होत आहे.
याच ठिकाणी झुराँग उतरले आहे. दुसरे रंगीत छायाचित्र हे सेल्फी असून त्यात ‘झुराँग’चा काही भाग दिसत असून त्यात उघडलेले सौर पॅनेल आणि अँटिना दिसत आहे. ‘चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (सीएनएसए) या चीनच्या अवकाश संशोधन संस्थेने रोव्हरने काढलेली छायाचित्रे बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App