भारत – अमेरिका अणुकरार रोखण्यासाठी चीनचा डाव्या पक्षांच्या मदतीने भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप; माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचा धक्कादायक खुलासा


प्रतिनिधी

पुणे : भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करार रोखण्यासाठी 2008 मध्ये चीनने भारतातल्या डाव्या पक्षांच्या मदतीने भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केला, असा धक्कादायक खुलासा भारताचे माजी परराष्ट्र सचिव आणि चीनमधले माजी राजदूत विजय गोखले यांनी केला आहे.”द लाँग गेम”, हाऊ चायना निगोशिएट इंडिया” या नवीन पुस्तकात विजय गोखले यांनी वरील खुलासा केला आहे.China tried to use Left to scuttle n-deal: Ex-foreign secy Vijay Gokhale-

डाव्या पक्षांचे नेते वैद्यकीय उपचारांच्या निमित्ताने चीनला जायचे. चिनी अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करायचे आणि याचा परिणाम भारतीय राजकारणावर घडवून आणायचे. 2008 मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचे सरकार होते. त्यांना डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता त्या आधारावर ते टिकून राहिले होते. तेव्हा चीनने आपल्या कम्युनिस्ट नेतृत्वाचा प्रभाव वापरून भारतातल्या डाव्या पक्षांच्या साह्याने भारतात अणु कराराविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता.



या घटनांमध्ये चीन कटाक्षाने पडद्यामागे राहिला आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या पुढे करून अणुकरारात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. भारताला एनएसजी (NSG) अर्थात अणू इंधन पुरवठादार देशांच्या संघटनेने काही सवलती जाहीर केल्या, तेव्हा चीनने काही “विशिष्ट प्रश्न” उपस्थित करून या सवलतींमध्ये देखील अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा आहे विजय गोखले यांनी केला आहे.

विजय गोखले परराष्ट्र धोरणात चीन विषयक तज्ञ मानले जातात. दीर्घ करिअरमध्ये त्यांनी १७ वर्षे चीनशी संबंधित आणि अग्नेय आशियाशी संबंधित परराष्ट्र मंत्रालयाच्या डेस्कवर काम केले आहे. ते भारतातले भारताचे चीनमध्ये राजदूत होते. बीजिंग, हाँगकाँग आणि ताइपेइ येथे त्यांनी भारताच्या परराष्ट्र डेस्कवर काम केले आहे. त्यांचे चिनी भाषेवर अर्थात मँडेरिनवर प्रभुत्व आहे.

आपल्या नवीन पुस्तकात त्यांनी चीन भारताबरोबर कशाप्रकारे वाटाघाटी करतो याची “इनसाईड स्टोरी” दिली आहे. चिनी परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये, परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांचा खोलवर अभ्यास, त्यांची रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत, रेकॉर्डचा वाटाघाटींमध्ये चपखल वापरआणि परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांच्या चिनी कम्युनिस्ट पक्षावर असलेल्या निष्ठा यावर ते सविस्तर भाष्य करतात.

चिनी परराष्ट्र अधिकारी चीन देशापेक्षा कम्युनिस्ट पार्टीवर निष्ठा ठेवून काम करतात. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांचे प्रतिनिधी देशाच्या राज्यघटनेवर निष्ठा ठेवून काम करतात हा महत्त्वाचा भेद विजय गोखले यांनी लक्षात आणून दिला आहे. चिनी परराष्ट्र खात्याचे अधिकारी नागरी वेशातले सैनिक अधिकारी असतात हे 1949 पासूनचे कम्युनिस्ट राजवटीतले सत्य गोखले उघडपणे मांडतात.

भारत-अमेरिका अणुकराराला चीनचा विरोध यासाठी होता की या निमित्ताने भारत आणि अमेरिका एकदा व्यूहरचनात्मक पातळीवर (strategic allies) एकत्र आले की आपल्या आंतरराष्ट्रीय वर्चस्वाला धोका तयार होईल.

आपल्या विस्तारवादी धोरणाला अडथळा उत्पन्न होईल याची चिंता भीती वाटली होती. म्हणून भारतातल्या डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या मदतीने अणु करार हाणून पाडण्यासाठी चीनने भारतीय राजकारणात त्यावेळी पहिल्यांदा अंतर्गत हस्तक्षेप केला. हे समजून सांगण्यावर गोखले यांनी भर दिला आहे.

जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मौलाना मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना देखील खो घालण्याचा प्रयत्न चीनने रशियाच्या साह्याने केला होता. जैश ए मोहम्मद ही आता “मृत संघटना” आहे आणि मौलाना मसूद अजहर हा “निवृत्त” झाला आहे, असा दावा पाकिस्तानने केला होता.

त्यावेळी चीनने पाकिस्तानची तळी उचलून धरली होती. त्यावेळी गोखले हे भारताचे मुख्य मुत्सद्दी म्हणून आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये सहभागी झाले होते. परंतु भारताने आपली सर्व वाटाघाटी कौशल्य वापरून मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यात यश मिळवले, असेही गोखले यांनी स्पष्ट केले आहे.

1998 मध्ये भारताने अणुस्फोट केले होते. त्यावेळी चीन भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करू शकलेला नव्हता, या मुद्द्याकडे देखील विजय गोखले यांनी आपल्या पुस्तकात लक्ष वेधले आहे.

परंतु, या सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब  म्हणजे भारतातल्या डाव्या पक्षांची कम्युनिस्ट चीनवर असलेली निष्ठा आणि भारतीय राष्ट्रीय हितापेक्षाही कम्युनिस्ट निष्ठेला डावे पक्ष देत असलेले महत्व विजय गोखले यांनी उघडे पाडले आहे.

China tried to use Left to scuttle n-deal: Ex-foreign secy Vijay Gokhale-

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात