फिलिपिन्सच्या नौकांवर पाण्याचा मारा, दक्षिण चीन समुद्रात चीन तटरक्षक दलाची दादागिरी


वृत्तसंस्था

मनिला : दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी सुरूच आहे. सैनिकांसाठी मदतसाहित्य घेऊन जाणाऱ्या फिलिपिन्सच्या दोन नौकांवर चीनच्या तटरक्षक दलाने पाण्याचा मारा केल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती फिलिपिन्सचे परराष्ट्रमंत्री तियाडोरो लॉक्सिन यांनी या कृतीवर नाराजी व्यक्त करत टीका आणि निषेध नोंदवला आहे. दरम्यान, चीनने फिलिपिन्सच्याच नौकांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा केला आहे. China targets Phillipines Boats in deep sea

अमेरिकी संरक्षण मदत करारांतर्गत फिलिपिन्सच्या नौका मंगळवारी सैनिकांना मदतसाहित्य घेऊन जात होत्या. परराष्ट्रमंत्री तियोडोरो लॉक्सिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलिपिन्सच्या नौका वादग्रस्त स्प्रेंटली बेटाच्या ‘सेंकेंड थॉमस शॉल’च्या प्रवासावर होत्या. परंतु चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजांनी पाण्याचा मारा करून अटकाव करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. परंतु पुरवठा विस्कळित झाला. ते म्हणाले की, चीनकडे या क्षेत्रात किंवा परिसरावर कोणताही कायदेशीर अधिकार नाही. चीनने आंतरराष्ट्रीय नियमांकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यांनी मागे थांबणे गरजेचे आहे. अशा प्रकारची कृती ही उभय देशातील संबंधांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

China targets Phillipines Boats in deep sea

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती