वृत्तसंस्था
बीजिंग : चीनच्या तियांगगॉंग अंतराळ स्थानकाला साहित्य पुरवण्यासाठी आणि अंतराळवीरांना मदत करण्यासाठी मालवाहू यानाने यशस्वी उड्डाण केले. तियानझोऊ-३ असे मालवाहू यानाचे नाव आहे. सुमारे सहा टन साहित्य घेऊन उड्डाण केलेले तियानझोऊ-३ हे यान तियांगगॉंग अंतराळ स्थानकावरील तिनाहे आणि तियानझोऊ-२ यांच्याशी संयोग करेल. China launches cargo rocket in space
अंतराळस्थानकाची बांधणी आणि तंत्रज्ञान निश्चिाती टप्प्यांतील तियानझोऊची पाचवी अंतराळ मोहीम आहे. यानातून तीन अंतराळवीरांसाठीचे साहित्य, अतिरिक्त अंतराळ वेशभूषा, निर्मिती साहित्य आणि इंधनाचे वहन करण्यात येत आहे.
शेनझोऊ-१३ चे पथक अंतराळ स्थानकावर सहा महिने राहण्याची शक्यता आहे. मागील अंतराळवीराच्या तुलनेत हा काळ दुप्पट असणार आहे. शेनझोऊ-१३ मोहिमेसाठी तीन सदस्यीय अंतराळवीरात एक महिला देखील असणार आहे. २००३ नंतर चीनने ११ जणांना अवकाशात पाठवले असून त्यापैकी केवळ दोनच महिलांचा लियू यांग आणि वांग यापिंग यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App