वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकन थिंक टँक चीथम हाऊसने दावा केला आहे की, चीनने अक्साई चीनपर्यंत रस्ते, चौक्या, हेलीपोर्ट आणि कॅम्प बनवले आहेत. येथे नवीन पुरवठा मार्ग तयार करण्याचा चीनचा मानस आहे. याद्वारे तो आपत्कालीन परिस्थितीत येथे सैन्य पाठवू शकतो. चीथम हाऊसने गेल्या 6 महिन्यांतील उपग्रह छायाचित्रांच्या विश्लेषणाच्या आधारे हा अहवाल दिला आहे.China builds roads, heliports and camps in Aksai China, strengthening military supply chain, US think tank reports
1962च्या युद्धानंतर चीनने ताब्यात घेतलेले क्षेत्र म्हणजे अक्साई चीन आहे.
थिंकटँकने ऑक्टोबर 2022 पासूनच छायाचित्रांद्वारे चीनच्या हालचालींवर नजर ठेवली. अक्साई चीन तलावाजवळील वादग्रस्त भागात हेलिपोर्ट बांधण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. चीन येथे 18 हँगर आणि लहान धावपट्टी बांधत आहे, जिथे आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने उड्डाण करू शकतात.
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सातत्याने येथे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अहवालानुसार, चीनने एलएसीला लागून असलेल्या एअरफील्डचे आणखी रुंदीकरण केले आहे. याद्वारे भारताच्या कारवायांना तोंड देण्याचा चीनचा मानस आहे.
रस्ते रुंद केले, वेदरप्रूफ कॅम्प बनवले
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) रस्त्यांचे रुंदीकरण केल्याचे चित्रांवरून स्पष्ट झाले आहे. अक्साई चीनमध्ये बांधलेले रस्तेही रुंद आहेत. याशिवाय चौक्या, आधुनिक वेदरप्रूफ कॅम्प, जेथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे, सोलर पॅनलचीही व्यवस्था करण्यात आली आहे. डेपसांग परिसरातही चिनी कारवाया सुरू आहेत. भारतानेही या भागात आपले सैन्य तैनात केले आहे.
चीनकडून महामार्ग बांधण्याचा प्रयत्न
अहवालात असे म्हटले आहे की, 2035 पर्यंत चीन शिनजियांग आणि तिबेटला जोडणारा महामार्ग तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. हा रस्ता अक्साई चीनमधून जाणार आहे. महामार्गामुळे चीनची पुरवठा साखळी सुकर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App