वृत्तसंस्था
बीजिंग : कोरोना विषाणूची निर्मिती नेमकी कशी झाली हे शोधण्यास अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना अपयश आल्यानंतर चीन आंतरराष्ट्रीय चौकशी अडथळा आणत आहे व माहिती देण्यास नकार देत आहे, असा आरोप अमेरिकेने केला. हे आरोप म्हणजे ‘या विनाशक विषाणूच्या उगमाचा मुद्याला बगल देण्याचा व त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका चीनने शनिवारी केली. China accuses USA for corona
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी तयार केलेला हा अहवाल शास्त्रीयदृष्ट्या विश्वारसार्ह नाही. या प्रकरणात अमेरिकेला अपेक्षित असलेले उत्तर या संस्था देऊ शकलेल्या नाहीत. कोराना विषाणूचा उगम शोधण्यासाठी सुरू असलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. विषाणूचा उत्पत्ती शोध हा विज्ञानाशी संबंधित आहे. त्यामुळे ही बाब गुप्तचर तज्ज्ञांच्या नाहीतर शास्त्रज्ञांच्या अखत्यारितील आहे, असे उत्तर अमेरिकेतील चीनी दूतावासाने दिले असल्याचा दावा चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App