मुख्यमंत्री भूपेश बघेलांनी छत्तीसगडमध्ये खाल्ले चाबकाचे फटके!! पण का?? कशासाठी??

वृत्तसंस्था

रायपुर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आज चक्क चाबकाचे फटके खावे लागले. छत्तीसगडमधल्या विरेंद्र ठाकूर यांनी भूपेश बघेल यांना चाबकाचे फटके मारले. एका मुख्यमंत्र्याला चाबकाचे फटके मारण्याएवढे छत्तीसगड या राज्यात काय घडले होते…?? Chief Minister Bhupesh Baghela whipped in Chhattisgarh !! But why ?? Why?

…तर यात राजकारण अजिबात नाही. आज बलिप्रतिपदा. छत्तीसगडच्या परंपरेनुसार गोवर्धनपूजा. छत्तीसगडमध्ये अशी प्रथा आहे की या दिवशी चाबकाचे फटके खाल्ले तर आपल्यावरचे अरिष्ट दूर होते. गेली अनेक वर्षे भूपेश बघेल हे छत्तीसगडमधल्या चंचगड या गावात जाऊन तिथल्या ठाकूर समाजाच्या परंपरेनुसार आपल्या हातावर चाबकाचे फटके ओढून घेतात. पूर्वी भरोसा ठाकूर हे भूपेश बघेल यांना फटके मारायचे. आज त्यांचा मुलगा वीरेंद्र कुमार यांनी आज भूपेश बघेल यांच्या हातावर चाबकाचे फटकारे ओढले.गोवर्धन पूजा भगवान श्रीकृष्णाच्या प्रीत्यर्थ केली जाते. त्याचबरोबर आदिवासींची ही अधिमान्यता आहे की जिथे गोवंश जास्त असतो तिथे समृद्धी जास्त येते. या गोवंशाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोवर्धन पूजा केली जाते.

भूपेश बघेल हे नेहमी येथे गोवर्धनपूजा पूजेसाठी येतात. पूजेत सहभागी होऊन तिच्या परंपरेनुसार आपल्या हातावर चाबकाचे फटकारे सहन करतात. छत्तीसगडवर कोणताही अनिष्ट येऊ नये, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली आहे.

Chief Minister Bhupesh Baghela whipped in Chhattisgarh !! But why ?? Why?

महत्त्वाच्या बातम्या