भारतात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वर विरोधकांचे प्रश्नचिन्ह, पण जर्मन परराष्ट्र मंत्र्यांना मात्र आकर्षण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात कोणतीही निवडणूक झाली आणि ती भाजप सोडून बाकीच्या पक्षांनी हरली, की सर्व विरोधी पक्ष इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात किंबहुना त्या पद्धतीलाच दोष देतात. पण याच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना वेगळे आकर्षण वाटले आहे. Chief Election Commissioner Rajeev Kumar demonstrates Electronic Voting Machine to German Foreign Minister Annalena Baerbock

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अन्नालेना बेयरबॉक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतीच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्ष चर्चा केली आहे. त्या भारतातल्या वेगवेगळ्या शहरांच्या दौऱ्यावर देखील आहेत. त्यांनी असाच एक दौरा निवडणूक आयुक्तालयाला केला. तेथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांना भारतातल्या निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. त्याचवेळी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतातल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विषयी उत्सुकता दाखविली. राजीव कुमार आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले.

जर्मनीत भारताप्रमाणेच द्विदल लोकशाही आहे. परंतु तिथल्या मतदान पद्धतीत आजही बॅलेट पेपरवर मतदान चालते. परंतु भारतात मात्र सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर सुरू होऊन काही वर्षे लोटली आहेत. त्याच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विषयी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना आकर्षण वाटले आणि त्यांनी निवडणूक आयोगात जाऊन त्याविषयीची माहिती घेतली.

Chief Election Commissioner Rajeev Kumar demonstrates Electronic Voting Machine to German Foreign Minister Annalena Baerbock

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात