भाजपची स्ट्रॅटेजी युती – प्रतियुती, आघाडी – प्रतिआघाडीच्या पलिकडची; एकूण मतदानातल्या 50 % वाट्याची!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिका निवडणुकांचे निकाल लागायचे आहेत. फक्त एक्झिट पोल जाहीर होऊन त्यात गुजरात, हिमाचल प्रदेश भाजपने जिंकल्याचे दाखविले जात आहे. पण भाजपची 2023 आणि 2024 च्या सर्व निवडणुकांची संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू झाली आहे. 2023 – 2024 Elections : BJP’s strategy of getting 50 + % votes in total votes polled, different form opposition alliance or non alliance

राजधानी दिल्लीतील मुख्यालयात भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची विस्तृत बैठक होत आहे आणि त्या बैठकीत भाजपची 2023 मध्ये होणाऱ्या 9 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांसाठी आणि त्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी मूलभूत स्ट्रॅटेजी ठरत आहे. या संदर्भातली कोणतीही अधिकृत घोषणा भाजपच्या कोणत्याही राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने केलेली नाही पण भाजप सध्या अवलंबत असलेली कार्यपद्धती आणि त्यांना निवडणुकीत मिळत असलेले यश यांचे नेमके गमक लक्षात घेतले, तर भाजपच्या पुढच्या स्ट्रॅटेजीवर थोडाफार प्रकाश पडू शकतो.

अंत्योदय योजना प्रभावी

सर्व राजकीय पक्षांची युती – प्रतियुती, आघाडी – प्रतिआघाडी या भाषेत निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरत असते. जागांची ऍडजेस्टमेंट आणि मतांची जाती आणि वर्गानुसार टक्केवारी या जुन्या गृहीतकांचा आधार घेऊन सर्व राजकीय पक्ष आपापली स्ट्रॅटेजी ठरवताना दिसतात. पण भाजप त्या पलिकडे जाऊन जास्तीत जास्त सर्वसमावेशक स्ट्रॅटेजी ठरविण्याचा प्रयत्न करताना दिसतो. जात आणि वर्ग या पारंपारिक आणि पठडीबद्ध व्होट बँकेची जुळवून घेण्यापलिकडे जो “अनटॅप्ड मतदार” आहे, त्या मतदाराला आकर्षित करण्याची भाजपची स्ट्रॅटेजी दिसते आहे. त्यादृष्टीने येत्या दीड वर्षात भाजप प्रामुख्याने अंत्योदय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा विचार करतो आहे. या योजनांचे लाभ कुठल्याही मध्यस्थ्याशिवाय थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा इरादा भाजपच्या अतिवरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर एकूण मतदानाची टक्केवारी आणि त्यात भाजपला नियमितपणे मिळणारा वाटा नेमकेपणाने लक्षात घेऊन तो वाटा कसा वाढेल आणि बाकी सर्व पक्षांपेक्षा त्या वाट्यात निम्म्याहून जास्ती भर कशी पडेल याकडे भाजपचे सर्व पातळयांवरचे नेतृत्व बारकाईने लक्ष देत असल्याचे दिसत आहे.

50 % मतांची लढाई

याचा अर्थ भाजपची लढाई प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांपेक्षा, एकूण झालेल्या मतदानात 50 % लढाई जिंकण्याकडे किंबहुना 50 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवण्याची आहे. आणि एकदा भाजपच्या कमळावर 50 % पेक्षा अधिक मतदारांनी शिक्कामोर्तब केले की पारंपारिक पठडीबद्ध जागांचे वाटप, जात आणि वर्ग यांच्या मतांची टक्केवारी वगैरे बाबींकडे पाहण्याची गरज पडत नाही. या बाबी तुलनेने दुय्यम ठरतात. काँग्रेस, प्रादेशिक पक्ष पठाडीबद्ध

काँग्रेस सह बाकीचे सर्व प्रादेशिक पक्ष आजही त्या जुन्याच स्ट्रॅटेजीने आपली राजकीय वाटचाल करताना दिसतात. काँग्रेस पारंपरिक पद्धतीनेच अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. बाकीचे सर्व प्रादेशिक पक्ष आपापल्या प्रादेशिक अस्मितांभोवती खेळताना दिसतात. पण नव मतदाराच्या नव्या आकांक्षा आणि अपेक्षा याकडे स्ट्रॅटेजी म्हणून कोणताच पक्ष लक्ष देतो असे दिसत नाही आणि इथेच भाजप बाकीच्या पक्षांपेक्षा पुढे सरकलेला दिसतो. मतदारांमधला “अस्पिरंट क्लास” भाजपकडे सर्वाधिक आकर्षित करण्याची पक्षाची स्ट्रॅटेजी दिसते आणि हा “अस्पिरंट क्लास” काही कोटींमध्ये आहे. त्या मतदारांचे प्रमाण मतदानात वाढविले की त्याचा परिणाम भाजपच्या दीर्घकालीन यशावर होण्याची शक्यता आहे.

10 लाख सरकारी नोकर भरती

केंद्र सरकार येत्या दीड वर्षात सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 लाख पदे भरणार आहे किंबहुना केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा बारकाईने विचार केला तर तिचा लाभ कितीने मल्टिप्लाय होईल हे नीट लक्षात येते. केंद्र सरकारच्या भरतीत सहभागी होणारे सर्वजण 35 वयोगटाच्या आतले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

हा नवा फंडा बाकीचे राजकीय पक्ष वापरताना दिसत नाहीत. त्याचवेळी अतिशय मायक्रो लेव्हलला भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे ही देखील पक्षासाठी टॉप प्रायोरिटी राहिली आहे. या संघटनात्मक बांधणीचे होमवर्क पक्के झाले की मग मतदानाची टक्केवारी आणि त्यातला एकूण वाटा वाढविणे याकडे भाजप लक्ष पुरवणार आहे. असेच पक्षाच्या हालचालीवरून दिसून येत आहे.

2023 – 2024 Elections : BJP’s strategy of getting 50 + % votes in total votes polled, different form opposition alliance or non alliance

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण