BJP Foundation Day 2022 : मोदींचा घराणेशाही पक्षांवर हल्लाबोल; भाजपचा सामाजिक न्याय पंधरवडा!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  भाजपने आपल्या 42 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दुहेरी रणनीती आखली आहे. एकीकडे आपल्या सर्वोच्च नेतृत्वाकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून देश आपल्या घराणेशाहीच्या राजकीय पक्षांवर जोरदार हल्लाबोल करायचा आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या पक्षीय पातळीवरून संपूर्ण देशात सामाजिक न्याय पंधरवडा पाळायचा…!! ही ती रणनीती आहे. BJP Foundation Day 2022: Modi’s attack on dynastic parties; BJP’s social justice fortnight !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणात या रणनीतीचेच प्रतिबिंब पडले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी जसा घराणेशाही चालवणार्‍या सर्व राजकीय पक्षांवर प्रहार केला तसाच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उल्लेख करून भारतीय जनता पार्टीच्या करोडो कार्यकर्त्यांना जनसेवेत समर्पित होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर स्वतः देखील भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून पक्ष जे दायित्व देईल ते काम पूर्ण करण्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या नेतृत्वाला दिला.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

  • – देशात एक राजकारण एखाद्या कुटुंबाच्या भक्तीचे आहे. तर दुसरे राजकारण देशभक्तीचे सुरू आहे. देशातील काही राजकीय पक्ष केवळ आपल्याच कुटुंबाचे भरणपोषण करताहेत.
  • – भाजपने घराणेशाहीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि हाच निवडणुकीचा मुद्दा बनवला. घराणेशाहीचे पक्ष आणि सरकारे देशाचे दुश्मन आहेत. त्यांना संविधानाशी काहीही देणे घेणे नाही. हे जनतेच्या लक्षात आले आहे.
  • – अनेक दशकांपासून घराणेशाही पक्षांनी फक्त मतांचे राजकारण केले. हे पक्ष मूठभर लोकांना आश्वासन द्यायचे आणि इतरांना ताटकळत ठेवायचे. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे सर्व काही व्होटबँकेच्या राजकारणाचे साईड इफेक्ट्स आहेत.
  • – भाजपने भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या राजकारणाशी संघर्ष केला. देशावासीयांना या राजकारणाचं नुकसान लक्षात आणून देण्यास भाजप यशस्वी ठरला. सबका साथ, सबका विकास या मंत्राच्या माध्यमातून भाजपने जनतेचा विश्वास संपादन केला.
  • – भारत 80 कोटी गरीब, वंचितांना मोफत रेशन देत आहे. हे जग सुद्धा पाहत आहे. 100 वर्षातील या सर्वात मोठ्या संकटाच्या काळातही गरीब लोक भुकेले राहू नयेत यासाठी केंद्र सरकारने 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.
  • जगाची युद्धजन्य परिस्थिती असताना भारत हा मानवतेसाठी लढतो आहे. सरकार राष्ट्रीय हिताचे काम करत आहे. आज देशाकडे धोरण नियतही आणि निर्णय शक्तीही आहे. निश्चयशक्ती सुद्धा आहे.
  • – भाजपचा यावेळचा स्थापना दिवस तीन कारणांनी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. प्रेरणा घेण्यासाठी ही मोठी संधी आहे. वेगाने जागितक बदल होताना भारतासाठी सातत्याने नव्या संधी निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये चार राज्यात भाजपचे सरकार आलं आहे. तसेच तीन दशकानंतर राज्यसभेत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाची सदस्य संख्या 100 पर्यंत गेली आहे.

BJP Foundation Day 2022 : Modi’s attack on dynastic parties; BJP’s social justice fortnight !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात