विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – लोकप्रिय कॉमिक पात्र चाचा चौधरी यास ‘नमामि गंगे’ या कार्यक्रमाचे शुभंकर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. Chaha Chawdhari will brand amesedor of Namami Gange
लोकप्रिय कॉमिक बुक पात्र चाचा चौधरी यांची निर्मिती व्यंग्यचित्रकार प्राणकुमार शर्मा यांनी १९७१ मध्ये केली होती. चाचा चौधरी कॉमिकचे अनेक भारतीय भाषेत दहा दशलक्षापेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली. त्यानंतर चाचा चौधरीचे टिव्ही मालिकेत रूपांतर झाले.
चाचा चौधरी पुन्हा अवतरले, केवळ मनोरंजनासाठी नाही तर, नमामि गंगे प्रकल्पासाठी!!
याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, की भारतात चाचा चौधरींना कोण ओळखत नाही. चाचा चौधरी यांचे डोकं संगणकापेक्षा वेगाने चालते. परंतु हेच चाचा चौधरी आता नमामि गंगे अभियानाचे शुभंकर म्हणून समोर येणार आहेत. मुलांना विशेषत: नदीच्या स्वच्छता अभियानात सामील करून घेण्याचा हा व्यावहारिक प्रयत्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App