भारतामध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली, आणखी चार लशींना मिळणार परवानगी


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : देशातील लसीकरणाचा वेग वाढविण्याबरोबरच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून यासाठी शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घेतले जात आहेत. परदेशात वापरल्या जाणाऱ्या आणखी चार लशींना भारतामध्ये देखील परवानगी मिळू शकते.central government has stepped up its efforts to speed up vaccination in India

परदेशात तयार झालेल्या आणि तेथील नियामक यंत्रणांनी ज्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेने देखी या लशी भारतात पहिल्यांदा शंभर रुग्णांना देण्यात येतील, सात दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येईल.



यातून नेमके काय निष्कर्ष येतात त्यावर पुढील लसीकरणाची रणनीती आखण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.ल आपल्या यादीमध्ये ज्यांचा समावेश केला आहे, अशा लशींचा येथेही आपत्कालीन वापर करण्यास मान्यता देण्यात येईल.

यामुळे परदेशातील लशी वेगाने भारतामध्ये येऊ शकतील तसेच औषधासाठी लागणारे साहित्य आणि अन्य सामग्रीची देखील वेगाने आयात करता येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

रशियाच्या लसीलाही मान्यता

देशाच्या औषध नियंत्रकांनी सोमवारी रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीच्या वापरास सशर्त परवानगी दिली. हैदराबादेतील रेड्डीज लॅबने या लसीच्या वापराला भारत सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष हाती आले असून तिची प्रतिकारक्षमता ९१.६ टक्के एवढी आहे.

central government has stepped up its efforts to speed up vaccination in India

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण