वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाढत्या कोरोना, ओमीक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोरोना रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये, याची नवी माहिती याद्वारे नागरिकांना दिली आहे Center announces new guidelines For corona patients with home Isolation
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या मध्ये ओमीक्रोनचे रुग्ण देखील आहेत. अशा रुग्णांसाठी ज्यांनी स्वतःला गृह विलागीकरण करून घेतले आहे. केंद्र सरकारने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.
कोरोना रुग्णानी गृहविलीगिकरण करून घ्यावे. त्यांनी हवेशीर खोलीत स्वतःला ठेवावे, भरपूर विश्रांती घ्यावी, शरीरातील प्राणवायूची पातळी सतत तपासावी, शरीराचे तापमान तपासावे, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
गरज भासल्यास कफ सिरप, पॅरासिटोमोलचा वापर करावा, वाफ घ्यावी. मात्र, रेमडीसिव्हर, ब्युडेसोनाईड नेबुलायझरचा वापर गृह विलिनीकरण असताना करू नये, अशी ताकीद दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App