इस्त्रायली दूतावासासमोरील स्फोटातील दोन संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडून जारी; तपासातून ठोस माहिती हाती येण्याची शक्यता


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – राजधानीतील ल्यूटन्स भागात इस्त्रायली दूतावासासमोर २९ जानेवारी २०२० रोजी झालेल्या स्फोटातील संशयितांचे सीसीटीव्ही फूटेज राष्ट्रीय तपास संस्था अर्थान एनआयएने जारी केले आहे. CCTV footage of suspects in a blast that took place on January 29th outside the Israel Embassy in Delhi

दोन संशयित युवक या दूतावासानजीक फिरताना या  सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. यापैकी एकाने निळा फुल शर्ट आणि निळी जीन्स घातलेली आहे तर दुसऱ्याने काळे जर्किन आणि काळी पँट घातलेली दिसत आहे. दोघांच्या तोंडावर मास्क असून काळे जर्किन आणि पँट घातलेल्या संशयित युवकाच्या खांद्याला एक मोठी बॅग अडकवलेली दिसते आहे. ५८ सेकंदांचे हे सीसीटीव्ही फुटेज असून दोघेही संशयास्पद रितीने या परिसरात फिरताना आढळत आहेत. ते दोघेही ऑटो रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण ऑटो थांबत नसल्याचे पाहून त्यांनी रस्ता ओलांडून ते पुढे आल्याचेही दिसत आहे.

एनआयएने जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही खुलासे होतील, अशी तपाससंस्थेला अपेक्षा आहे.

ल्यूटन्स दिल्लीत इस्त्रायली दूतावासासमोर २९ जानेवारी २०२० रोजी स्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये जीवितहानी झालेली नव्हती. पण ही तर सुरूवात आहे, अशी धमकी देणारे विडिओ दहशतवादी संघटनांनी नंतर जारी केले होते. या स्फोटाचा प्राथमिक तपास दिल्ली पोलीसांनी केल्यानंतर तो एनआयएकडे सोपविण्यात आला होता. दिल्ली पोलीसांनी त्यावेळेला काही सीसीटीव्ही फुटेज तपासली होती. पण त्यातून तपासात फारशी प्रगती झालेली नव्हती.

आता एनआयएने वेगळे सीसीटीव्ही फुटेज मिळवून ते जारी केले आहे. ते संशयितांचे फुटेज आहे, असे एनआयएने स्पष्ट केले आहे. या फुटेजमुळे संशयित सापडण्यास आणि स्फोटाच्या मूळापर्यंत जाण्यास मदत होईल, अशी एनआयएची अपेक्षा आहे.

CCTV footage of suspects in a blast that took place on January 29th outside the Israel Embassy in Delhi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात