वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटेल. आज ते काँग्रेसमधल्या जी 23 नेत्यांच्या भेटी घेणार असल्याच्या बातम्या आल्या,Captain Saheb out of the way; Important discussion with Ajit Doval at home !!
पण आज अचानक कॅप्टन साहेबांनी “आऊट ऑफ द वे” जाऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कॅप्टन साहेबांना केंद्रातले मोदी सरकार नेमका कोणता “नवा राजकीय रोल” देऊ इच्छिते याविषयीच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याखेरीज कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी वारंवार शेतकरी आंदोलनात पाकिस्तान पुरस्कृत फुटीरतावादी घुसल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर तर ही भेट नाही ना तसेच यामध्ये पंजाबच्या सुरक्षितते संदर्भातला कोणता महत्त्वाचा अँगल दोघांच्या चर्चेत आला याविषयी देखील तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
आत्तापर्यंत अनेक पक्षांमध्ये अनेक बंडे झाली. पण एखादे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राजकीय गदारोळात जाऊन भेटले असे दुसरे उदाहरण नाही. कॅप्टन अमरिंदरसिंग हे भारतीय लष्कराच्या सेवेत होते 50 वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर ते स्वतंत्रपणे मते मांडत असतात. त्यामुळे कॅप्टन साहेबांनी “आऊट ऑफ द वे” जाऊन अजित डोवाल यांची घेतलेली भेट ही देशाच्या राजधानीत आणि पंजाबच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Delhi: Former Punjab CM Captain Amarinder Singh leaves from the residence of NSA Ajit Doval pic.twitter.com/1pusKM9HhO — ANI (@ANI) September 30, 2021
Delhi: Former Punjab CM Captain Amarinder Singh leaves from the residence of NSA Ajit Doval pic.twitter.com/1pusKM9HhO
— ANI (@ANI) September 30, 2021
अमरिंदर सिंग यांना केंद्रात कृषिमंत्री पद देण्याच्या बातम्या आल्या असल्या तरी त्यात तथ्य किती आहे? याविषयी शंका आहे. पण त्यांना जर शेतकरी आंदोलनात मध्यस्थाची भूमिका देणार असतील तर त्यादृष्टीने देखील अजित डोवाल यांच्याशी चर्चा महत्वाची असू शकते.
त्याच वेळी पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलून देखील देशाच्या सुरक्षेसंदर्भात काही तडजोड होते आहे का? किंवा आणखी कोणती महत्त्वाची पावले उचलण्याची गरज आहे का? याविषयी कॅप्टन साहेबांनी काही अजित डोवाल यांना इनपुट दिला आहे का याविषयी देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App