यंदा भर उन्हाळ्यातही जम्मू – काश्मीरचा दरबार हलणार नाही, कोरोनामुळे परंपरेत खंड


विशेष प्रतिनिधी 

श्रीनगर – उन्हाळा सुरु झाला की जम्मू – काशीमरमध्ये वेगळीच धांदल सुरु होते. ती म्हणजे सचिवालय श्रीनगरला हलवण्याची. थंडीत राजधानी श्रीनगरमधील हा दरबार उपराजधानी असलेल्या जम्मूत येतो. वर्षानुवर्षे हा रिवाज सुरु आहे. मात्र यावेळी कोरोनामुळे यात खंड पडणार आहे. Capital will remain in Jammu this summer

मात्र सचिवालयाचे काम पुरेशा कर्मचाऱ्यांसह श्रीनगर व जम्मू अशा दोन्ही ठिकाणी सुरू पाहणार आहे, असेही सांगण्यात आले.



जम्मू-काश्मी रमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने उन्हाळ्यातील राजधानी जम्मूहून श्रीनगरला हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने तूर्त पुढे ढकलला आहे. हिवाळ्यात जम्मू व उन्हाळ्यात श्रीनगर अशी राजधान्यांची विभागणी असते.

मात्र राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याचे ‘दरबारा’चे असे स्थलांतर करताना कर्मचारी व नागरिक यांना धोका उद्भवू शकतो आणि ऑनलाइन कामकाजातही अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे राजधानी हलविण्याचा निर्णय सध्या लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे ट्विट जम्मू-काश्मीणरच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयाने गुरुवारी केले.

Capital will remain in Jammu this summer


इतर बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात