
वृत्तसंस्था
उन्नाव : उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती झाली आहे… बलात्कारातील आरोपी आमदार कुलदीप सेनगर याची पत्नी संगीता सेनगर यांना जिल्हा पंचायत निवडणूकीत दिलेली उमेदवारी भाजपने रद्द केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांनी ही घोषणा केली आहे.Candidature of Sangeeta Sengar, wife of former BJP MLA Kuldeep Singh Sengar who is a convict in 2018 Unnao rape case, has been cancelled: UP BJP Chief Swatantra Dev Singh
संगीता सेनगर भाजपाच्या तिकीटीवर जिल्हा पंचायत निवडणूक लढणार असल्याची घोषणा आधी करण्यात आली होती. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद होते.
संगीता या सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार होत्या. या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला घेरले. याचे परिणाम इतरत्र प्रतिकूल ठरतील, हे पाहून आता भाजपने संगीता सेनगर यांची उमेदवारी रद्द केली आहे.
Candidature of Sangeeta Sengar, wife of former BJP MLA Kuldeep Singh Sengar who is a convict in 2018 Unnao rape case, has been cancelled: UP BJP Chief Swatantra Dev Singh (in file pic)
Her name was in the list of BJP candidates released on April 9 for UP Zila Panchayat polls pic.twitter.com/FMSk8sIEiR
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 11, 2021
कुलदीप सेनगर हे भाजपा आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
गेल्यावर्षी भाजपाने पक्षातून बडतर्फ केलेल्या कुलदीप सेनगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने सेनगर यांना दोषी ठऱवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
१० लाखांचा दंडही ठोठावला होता. यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा कुलदीप सेनगर यांचा दावा आहे. २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Candidature of Sangeeta Sengar, wife of former BJP MLA Kuldeep Singh Sengar who is a convict in 2018 Unnao rape case, has been cancelled: UP BJP Chief Swatantra Dev Singh
महत्त्वाच्या बातम्या
- NIA Antilia Case : पोलीस अधिकारी रियाझ काझींना अटक, अँटिलया प्रकरणात सचिन वाझेंना मदत केल्याचा आरोप
- ‘लस उत्सवा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना 4 आवाहने, वाचा सविस्तर…
- WATCH : पाच हजारांत सुरू करा नवा बिझनेस, महिन्याला होईल एवढी कमाई
- महाराष्ट्रात सर्वाधिक लस पुरवठा ; लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक लस मिळायला हवी होती ; हर्षवर्धन यांचे खणखणीत उत्तर
- भ्रष्टाचारप्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये, अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स