रेल्वे कन्फर्म तिकीट रद्द केल्यास जीएसटी लागणार : कॅन्सलेशन चार्जवर 5 टक्के कर; वाचा सविस्तर…


प्रतिनिधी

मुंबई : रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक धक्कादायक बातमी आहे. जर तुम्ही ट्रेनचे कन्फर्म तिकीट रद्द केले तर तुम्हाला त्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरावा लागणार आहे. याबाबतची माहिती देत अर्थ मंत्रालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे.Cancellation of railway confirmed ticket incurs GST 5 percent tax on cancellation charge; Read more…

कन्फर्म ट्रेन तिकीट रद्द केल्यावर जीएसटी का?

अर्थ मंत्रालयाच्या टॅक्स रिसर्च युनिटच्या (टीआरयू) परिपत्रकानुसार, तिकीट बुकिंग करणे हा कंत्राट आहे. ज्या अंतर्गत सेवा प्रदाता (IRCTC/भारतीय रेल्वे) ग्राहकांना सेवा प्रदान करते. जेव्हा प्रवाशांकडून या कराराचा भंग होतो, तेव्हा सेवा प्रदात्यांना अल्प रक्कम भरपाई द्यावी लागते. जे कॅन्सलेशन चार्ज म्हणून प्रवाशांकडून वसूल केले जाते. आता या रद्द करण्याच्या शुल्कावरही जीएसटी भरावा लागणार आहे.प्रथम श्रेणीचे तिकीट रद्द केल्यावर ५ टक्के जीएसटी

परिपत्रकानुसार, विशिष्ट वर्गाचे बुकिंग रद्द करण्याचा GST दर त्या वर्गासाठी सीट/बर्थच्या बुकिंगच्या वेळी लागू होईल तसाच असणार आहे. उदाहरणार्थ, प्रथम श्रेणी किंवा एसी कोचसाठी जीएसटी दर 5 टक्के आहे. तर या वर्गासाठी कॅन्सलेशन फी 240 रुपये (प्रति प्रवासी) असणार आहे.

प्रथम श्रेणी/एसी डब्यांसाठी एकूण रद्दीकरण शुल्क रु. 252 (रु. 12 GST + रु. 240) आहे. सेकंड स्लीपर क्लाससह इतर श्रेणींवर जीएसटी नाही. तथापि, ट्रेन सुटण्याच्या 48 तास किंवा त्याहून अधिक तास आधी तिकीट रद्द केल्यास 240 रुपये कॅन्सलेशन चार्ज लागू होतो.

कन्फर्म तिकीट रद्द करण्याचे शुल्क किती आहे?

एसी फर्स्ट क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 240 रुपये.

एसी टू-टियर किंवा प्रथम श्रेणीसाठी 200 रुपये.
एसी थ्री टियर किंवा एसी चेअर कार किंवा एसी थ्री इकॉनॉमी क्लाससाठी 180 रु.
स्लीपर क्लाससाठी 120 रुपये.
द्वितीय श्रेणीसाठी 60 रुपये.
किती कपात होणार आहे?

कन्फर्म ट्रेन तिकिटांच्या बाबतीत, जर तिकीट 48 तासांच्या आत आणि नियोजित सुटण्याच्या वेळेच्या 12 तास आधी रद्द केले गेले, तर एकूण रकमेपैकी 25 टक्के कपात केली जाईल.

जर तिकीट 4 तासांपूर्वी आणि ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या 12 तासांपूर्वी रद्द केले असेल, तर अर्धे पैसे म्हणजेच तिकिटाच्या 50% कापले जातील.
जर तुम्ही ट्रेनच्या नियोजित वेळेच्या 4 तास आधी तिकीट रद्द करू शकत नसाल, तर रिफंडसाठी एक पैसाही दिला जाणार नाही.

प्रतीक्षा यादी आणि आरएसी तिकिटे ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या 30 मिनिटे आधी रद्द करणे आवश्यक आहे, अन्यथा परतावा दिला जात नाही.

Cancellation of railway confirmed ticket incurs GST 5 percent tax on cancellation charge; Read more…

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”