राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत निर्णय


सीबीएसई बोर्डापाठोपाठ महाराष्ट्रातही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.Cancellation of 12th standard examination in the state, decision in the meeting of Disaster Management Department 


प्रतिनिधी

मुंबई : सीबीएसई बोर्डापाठोपाठ महाराष्ट्रातही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ.



सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.

त्याप्रमाणे आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. त्यामध्ये परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा आमचे पहिलं प्राधान्य आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते.

दहावी आणि बारावी परीक्षेबाबत पंतप्रधानांनी केंद्रीय पातळीवर निर्णय घ्यावा. त्यामुळे राज्यांना निर्णय घेणे सोपे जाईल, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

त्यामुळे सीबीएई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केल्यावर राज्यातही बारावी परीक्षा रद्द होण्याचा निर्णय होणे स्वाभाविक होते.

Cancellation of 12th standard examination in the state, decision in the meeting of Disaster Management Department

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात