विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सायबर क्राइमच्या बऱ्याच केसेस तुम्ही ऐकल्या असतील. पण व्हॉट्सअॅप हॅक करून पैशासाठी ब्लॅकमेल करण्याची केस तुम्ही कधी ऐकलीय का? तर दिल्ली पोलिसांना सुद्धा या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे. दिल्ली पोलिसांनी 33 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. तो लोकांचे फोन हॅक करून पैशासाठी ब्लॅकमेल करायचा. केमेलम इम्मॅन्युएल अनिवेतालु असे या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.
Can your WhatsApp be hacked? WhatsApp got hacked and blackmailing in Delhi
सदर व्यक्ती लोकांच्या फोनवर मालवेअर लिंक पाठवायचा. त्या नंतर मोबाइलचा असेस मिळाल्यानंतर व्हॉट्सअॅपसारखे मेसेजिंग अँपस वापरून लोकांकडे पैश्याची मागणी करायचा.
CYBER CRIME : केंद्र सरकारचा Fake News तपासणी करणारा विभागही cyber crime च्या विळख्यात ; PIB ची बनावट वेबसाईट उघड
दिल्ली पोलिसांनी याआधी मालवेअर व्हायरसद्वारे ई मेल अकाउंट हॅक करून सायबर क्राइम केलेल्या केसेस ऐकल्या होत्या. पण मालवेअर लिंक एखाद्या मोबाइलचा रिमोट असेस मिळविण्यासाठी वापरण्याची ही पहिलीच केस दिल्ली पोलिसांनी पाहिली आहे. असे डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस के पी एस मल्होत्रा यांनी सांगितले.
मल्होत्रा म्हणतात, अटक करण्यात आलेला नागरीक दिल्ली आणि बंगळुरूमधून काम करायचा. लोकांचे फोन हॅक करू त्यांच्याकडे पैशाची मागणी करणे, त्यांच्या मोबाइलमधील डेटाच्या आधारावर त्यांना ब्लॅकमेल करणे असे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App