Shubhendu Adhikari security : बंगालच्या ममता सरकारला कलकत्ता हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार शुभेंदु अधिकारी यांची सुरक्षा पूर्ववत करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. तृणमूल कॉंग्रेस सरकारने 18 मे रोजी शुभेंदु अधिकारी यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर भाजप नेते शुभेंदू यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने म्हटले आहे की, शुभेंदूंना कोणताही धोका होऊ नाही याची काळजी घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. न्यायमूर्ती शिवकांत प्रसाद यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, शुभेंदू अधिकारी यांना कोणताही धोका होणार नाही, हे सुनिश्चित करणे ही राज्याची जबाबदारी आहे. अन्यथा सरकारला दोषी मानले जाईल. Calcutta High court blow to Mamata government, Orders to restore BJP Leader and LoP Shubhendu Adhikari security
वृत्तसंस्था
कोलकाता : बंगालच्या ममता सरकारला कलकत्ता हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार शुभेंदु अधिकारी यांची सुरक्षा पूर्ववत करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. तृणमूल कॉंग्रेस सरकारने 18 मे रोजी शुभेंदु अधिकारी यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर भाजप नेते शुभेंदू यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने म्हटले आहे की, शुभेंदूंना कोणताही धोका होऊ नाही याची काळजी घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. न्यायमूर्ती शिवकांत प्रसाद यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, शुभेंदू अधिकारी यांना कोणताही धोका होणार नाही, हे सुनिश्चित करणे ही राज्याची जबाबदारी आहे. अन्यथा सरकारला दोषी मानले जाईल.
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना राज्य सरकारडून सुरक्षा बहालीवर हायकोर्टाने केंद्राकडून मिळालेल्या सुरक्षेवरही टिप्पणी केली. कोर्टाने म्हटले की, अधिकारी यांना केंद्राकडून आधीच पुरेशी सुरक्षा मिळाली आहे. या खटल्याच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने पश्चिम बंगाल प्रशासनाच्या सुरक्षा संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शुभेंदू अधिकारी यांना देण्यात आलेली सुरक्षा का काढली गेली आहे, या संदर्भात अहवाल दाखल करावा, असे कोर्टाने म्हटले होते. त्याच वेळी बंगाल सरकारने म्हटले की, गाइडलाइननुसार अधिकारी यांना सुरक्षा पुरवली जात आहे.
केंद्र सरकारकडून झेड-कॅटेगरी सुरक्षा मिळून त्यांना तीन क्षेत्रांत राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता असल्याचे शुभेंदु अधिकारी यांनी कोर्टाला सांगितले होते. यात पायलट कार, रूट लायनिंग आणि सार्वजनिक सभांचे निरीक्षण यांचा समावेश आहे. टीएमसी सोडल्यानंतर आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गतवर्षी डिसेंबरमध्ये अधिकारी यांना झेड-श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती. 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नंदीग्रामच्या जागेवरून निवडणूक लढविली आणि जिंकली. 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूक निकालात सीएम बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीने मोठा विजय नोंदविला होता. 293 जागांवर झालेल्या निवडणुकांमध्ये 213 जागा पक्षाच्या खात्यात आल्या. त्याचवेळी राज्यात सत्ताधारी पक्षाला कठोर स्पर्धा देणार्या भारतीय जनता पक्षाने 77 जागा जिंकून देदीप्यमान कामगिरी केली होती. मुख्य म्हणजे खुद्द ममतांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
Calcutta High court blow to Mamata government, Orders to restore BJP Leader and LoP Shubhendu Adhikari security
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App