Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची तयारी! मोदी शहांचे धक्कातंत्र ; महाराष्ट्रात कुणाला मिळणार संधी?


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी बैठका घेणं देखील सुरु केलं आहे.


गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेश संदर्भात भेट घेतली. 


यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. Cabinet Reshuffle: Union Cabinet ready for reshuffle! Modi Shah’s shock system


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या कयासांदरम्यान उच्चस्तरीय बैठक होत आहे.
उत्तर प्रदेशात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशावेळी आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे.

आजवर आपण पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या कामाची पद्धत पाहिली तर ते नेहमीच धक्कातंत्राचा वापर करत आले आहेत. अशावेळी मंत्रिमंडळात फेरबदलाविषयी महाराष्ट्र भाजपबाबत एखादा अनपेक्षित निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्यांचही सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दुसऱ्या टर्ममधील मोदी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे मंत्र्यांच्या छोट्या-छोट्या गटाला बोलावून त्यांची भेट घेत आहेत. यावेळी त्या-त्या मंत्र्याच्या संबंधित मंत्रालयांचा आढावा देखील ते घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह हे देखील बैठकीला हजर होते.

फेरबदलासाठी एकूण 23 खाते निवडण्यात आले आहेत-

  • धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंग तोमर, गजेंद्रसिंग शेखावत, महेंद्र नाथ पांडे, हरदीप पुरी यांच्या मंत्रालयांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. यापूर्वी व्ही.के. सिंग आणि अन्य मंत्र्यांची देखील पंतप्रधानांनी आढावा बैठक घेतली आहे.
  • त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अशावेळी आगामी निवडणुका लक्षात घेऊन संबंधित राज्यातील नेतृत्वाला मंत्रिमंडळात अधिक संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
  • देवेंद्र फडणवीसांना केंद्रात संधी मिळणार?
  • दरम्यान, जर आता मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले तर त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला स्थान मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
  • राज्यात भाजपचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी दिली जाणार असं सातत्याने बोललं जात होतं. त्यामुळे आता जर मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर अशावेळी केंद्रीय नेतृत्व फडणवीसांना एखादी मोठी जबाबदारी सोपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  • मात्र, असं असलं तरी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या होत्या. त्यांनी स्पष्ट केलं होतं की, आपण सध्या तरी राज्यातच काम करणार आहोत.

महत्त्वाच्या बातम्या

Cabinet Reshuffle: Union Cabinet ready for reshuffle! Modi Shah’s shock system

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती