कॉंग्रेसमधील सी म्हणजे कनींग- धूर्त, भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपावर बसपच्या मायावती यांचा कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाचे भारतीय जनता पक्षाशी संगनमत असल्याचा आरोप करत बसप ही भाजपाची बी टीम असल्याची टीका कॉँग्रेसने केला आहे. यावरून बसपच्या सर्वेसर्वो मायावती यांनी कॉँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.C in Congress means cunning, BSP’s Mayawati lashes out at Congress over BJP’s B-team

कॉँग्रेसमधील सी म्हणजे इंग्रजीतील कनींग शब्द आहे. याचा अर्थ धूर्त होतो. बहुजन मतांच्या जोरावर सत्तेवर येऊनही कॉँग्रेसने त्यांना कायम असहाय्य करून ठेवले, अशी टीका त्यांनी केली आहे.याबाबत मायावती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कॉंग्रेसमधील सी म्हणजे कनींग आहे. हा एक ‘धूर्त’ पक्ष आहे. बहुजनांना कॉँग्रेसने कायमच असहाय्य ठेवले आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार असतानाही त्यांनी बहुजनांना गुलामीत ठेवले होते.त्याच काळात बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार नव्हते.

मायावती म्हणाल्या, उत्तर प्रदेशातही ऑक्सिजनवर चालणाºयाा कॉंग्रेसचे म्हणणे आहे की बसपाचा ‘बी’ म्हणजे ‘भाजपा’. त्यांचे हे आरोप अत्यंत आक्षेपार्ह आहेत. बसपचा ‘बी’ म्हणजे बहुजन, ज्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींचा समावेश आहे. धार्मिक अल्पसंख्यक आणि इतर उपेक्षित घटकांचे लोक आमच्या सोबत आहेत. त्यांनाच बहुजन म्हटले जाते.

मायावतींनी असा दावा केला की, राज्यातील निवडणुका कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजपाच्या काळात कधीही निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष झाल्या नाहीत. कारण सत्तेसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. बसपच्या शासनकाळात मात्र सगळ्या निवडणुका नि:पक्ष झाल्या.

C in Congress means cunning, BSP’s Mayawati lashes out at Congress over BJP’s B-team

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती