वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल :2025 पर्यंत प्रत्येक 10 पैकी 6 जण नोकरी गमावतील ; मानव आणि यंत्रातील द्वंद्व

19 देशांमधील प्राइस वॉटर हाऊस कूपर कंपनीत काम करणाऱ्या 32,000 कर्मचार्‍यांच्या सर्वेक्षणानंतर अहवाल प्राप्त.


वाढत्या यांत्रिकिकरणाचा हा परिणाम असल्याचे देखील अहवालात स्पष्ट केले आहे. By 2025, 6 out of 10 people will lose their jobs; Shocking revelation from WEF report


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्लीः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार 2025 पर्यंत संपूर्ण जगात 10 पैकी 6 जण नोकरी गमावतील. यामागचे कारण म्हणजे यांत्रिकिकरण.मशीन आणि मनुष्य यातील हे द्वंद्व असणार आहे.


या अहवालात प्रथम कोरोनादरम्यान मशीन्सचा वापर कसा झाला हे देखील दर्शविलय. शिनुआच्या माहितीनुसार, 19 देशांमधील प्राइस वॉटर हाऊस कूपर कंपनीत काम करणाऱ्या 32,000 कर्मचार्‍यांच्या सर्वेक्षणानंतर अहवाल प्राप्त झालाय.

या सर्वेक्षणानुसार जगभरातील 40 टक्के कर्मचार्‍यांचे मत आहे की येत्या 5 वर्षांत आपली नोकरी गमावली जाईल, तर 56 टक्के लोकांना असे वाटते की भविष्यातही त्यांना दीर्घ मुदतीच्या रोजगाराचे पर्याय मिळू शकतील.

नोकर्‍या कशा संरक्षित कराव्यात
60 टक्क्यांहून अधिक लोकांना नोकऱ्यांच्या संरक्षणासाठी सरकारची गरज आहे. जगभरातील लॉकडाऊनमध्ये 40 टक्के लोकांनी त्यांचे डिजिटल कौशल्य सुधारले, तर 77 टक्के लोक काहीतरी नवीन शिकण्यास आणि स्वत: ला सुधारण्यास तयार आहेत.

गेल्या जागतिक आर्थिक अहवालानुसार वाढती मशीन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे 8.5 कोटी रोजगार धोक्यात आहेत, सद्य परिस्थितीत 9.7 कोटी रोजगार निर्मिती होईल, असेही सांगितले जात आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकर्‍या धोक्यात असल्याची भीती सतावत आहे.

By 2025, 6 out of 10 people will lose their jobs; Shocking revelation from WEF report

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*