BSP Candidates List : मायावतींनी यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बसपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बहुजन समाज पक्षाने विशेषत: पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने पश्चिम यूपीमधील 58 विधानसभा जागांपैकी 53 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. BSP Candidates List Mayawati announces first phase list of BSP candidates, read more
वृत्तसंस्था
लखनऊ : मायावतींनी यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बसपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बहुजन समाज पक्षाने विशेषत: पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने पश्चिम यूपीमधील 58 विधानसभा जागांपैकी 53 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
15-01-2022-BSP UP VIDHAN SABHA FIRST LIST-I pic.twitter.com/ioAwDKMI9s — Mayawati (@Mayawati) January 15, 2022
15-01-2022-BSP UP VIDHAN SABHA FIRST LIST-I pic.twitter.com/ioAwDKMI9s
— Mayawati (@Mayawati) January 15, 2022
पहिल्या टप्प्यातील महत्त्वाच्या जागांचे बोलायचे झाले तर, बसपाने कैरानामधून राजेंद्र सिंह उपाध्याय आणि बुढाणामधून मोहम्मद अनिश यांना तिकीट देण्यात आले आहे. कृपाराम शर्मा यांना नोएडामधून तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने रझिया खान यांना अलीगडमधून उमेदवारी दिली आहे.
15-01-2022-BSP UP VIDHAN SABHA FIRST LIST-2&3 pic.twitter.com/dMkO3E9L3H — Mayawati (@Mayawati) January 15, 2022
15-01-2022-BSP UP VIDHAN SABHA FIRST LIST-2&3 pic.twitter.com/dMkO3E9L3H
10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.
BSP Candidates List Mayawati announces first phase list of BSP candidates, read more
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App