विशेष प्रतिनिधी
पाटणा : राष्ट्रीय जनता दलामध्ये भाऊबंदकी उफाळून आली आहे. लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाला (राजद) सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एका ट्विटद्वारे आपला हा निर्णय जाहीर केला.Brotherhood in Lalu’s house, preparing to leave the big party as the younger one is getting more importance
तेजप्रताप यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकले. सर्वच कार्यकर्त्यांना सन्मान दिला. लवकरच मी वडिलांची भेट घेऊन माझा राजीनामा देईल. त्यांनी आपले ट्विट लालूप्रसाद यादव, राजद, आपले कनिष्ठ बंधू तेजस्वी यादव, मातोश्री राबडी देवी, भगिणी मीसा भारती व काँग्रेसचे हरयाणातील आमदार चिरंजीव राव यांना टॅग केले आहे.लालूंच्या
लालूंच्या तेजप्रताप व तेजस्वी यादव या दोन्ही मुलांत पक्षाचे नेतृत्व करण्याच्या मुद्यावर टोकाचे मतभेद होते. या प्रकरणी त्यांच्यात वादही झाले. पण, दोघांनीही यावर केव्हाच जाहीर भाष्य केले नाही. पण, लालूंनी पक्षाची धूरा तेजस्वींकडे सोपवण्याचे संकेत दिल्याने तेजप्रताप चांगलेच नाराज होते. त्यांच्या नाराजीची परिणिती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App