विशेष प्रतिनिधी
लंडन – फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला परत आणण्यासाठी भारताने येथील न्यायालयात अत्यंत चांगली बाजू मांडली असून ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वानसन दिले आहे.Briton will ready for sending back Mallya to India
ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयाकडूनही या प्रकरणी ब्रिटन सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांची आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच, दोन देशांमधील संबंध दृढ करण्यासाठीच्या ‘रोडमॅप-२०३०’बाबतही त्यांनी चर्चा केली.भारतात आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेल्या आरोपींच्या प्रत्यार्पणाचाही मुद्दा चर्चेत उपस्थित झाला.
मल्ल्याच्या हस्तांतराबाबतची प्रक्रिया सुरु आहे. मल्ल्याने भारतात मोठा गैरव्यवहार केल्याचे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना मान्य असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी ते सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करत आहेत, असे श्रृंगला यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App